एक्स्प्लोर

IPL 2023 : मयांक-भुवनेश्वरचा पत्ता कट, या खेळाडूला हैदराबादने केलं कर्णधार

SRH Captain : सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

Aiden Markram SRH Captain : सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. हैदराबाद संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. मारक्रमने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स फ्रेंचायजीने जेतेपद पटकावलं होतं.  

SA20 स्पर्धेत सनरायजर्स ईस्टर्न कॅप संघाचं नेतृत्व एडन मारक्रम याच्याकडे सोपवण्यात आले होते. सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगली होती. यामध्ये सनरायजर्स ईस्टर्न कॅप संघाची कामगिरी जबरदस्त होती.  सहा संघामध्ये रंगलेल्या या स्पर्धेत मारक्रमच्या संघाने बाजी मारली. फायनल सामन्यात सनरायजर्स फ्रेंचाइजीने प्रिटोरिया कॅपिटल्सचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. SA20 मध्ये आपल्या संघाची कामगिरी पाहाता सनराजयर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये एडन मारक्रम याच्याकडे जबाबदारी सोपवली. 

हैदराबादच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत मारक्रमशिवाय भुवनेश्वर कुमार आणि मयांक अग्रवाल यांची नावे चर्चेत होती. पण आज हैदराबाद संघाने ट्वीट करत मारक्रमला कर्णधार म्हणून नियुक्त केले. दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू अल्पवधीतच भारतात प्रसिद्ध झाला आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व केल्यामुळे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. तसेच तो विश्वचषक जिंकणारा एकमेव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. मार्करम याने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंडर 19 विश्वचषक जिंकून दिला होता.  

मारक्रमची कामगिरी -
एडन मारक्रम याने IPL च्या मागील हंगमात हैदराबादसाठी विस्फोटक फलंदाजी केली आहे. मारक्रम याने आयपीएल 2022 मध्ये  47.63 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 381 धावांचा पाऊस पाडला होता.  2021 मध्ये IPL पदार्पण करणाऱ्या मारक्रम याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 527 धावा चोपल्या आहेत.  

आयपीएलच्या सर्व संघाचे कर्णधार  

सनरायजर्स हैदराबाद – एडन मारक्रम

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डु प्लेसिस

चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी

 कोलकाता नाइट रायडर्स- श्रेयस अय्यर

 पंजाब किंग्स – शिखर धवन

 दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (दुखापतीमुळे यंदा दुसऱ्याकडे जबाबदारी जाऊ शकते)

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा

लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल

गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या

आयपीएल स्पर्धा कधीपासून

बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.  21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget