एक्स्प्लोर

SRH vs KKR Match Live Update : राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी, हैदराबादचा सात विकेटनं विजय

SRH vs KKR Match Live Update : केन विल्यमसन हैदराबाद संघाचं तर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने

LIVE

Key Events
SRH vs KKR Match Live Update : राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी, हैदराबादचा सात विकेटनं विजय

Background

IPL 2022, SRH vs KKR  Match Live Update : सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 25 सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या (Mumbai)  ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळला जाणार आहे. केन विल्यमसन हैदराबाद संघाचं तर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.  संथ सुरुवातीनंतर हैदराबाद संघाने चेन्नई आणि गुजरात संघाविरोधात विजय मिळवला आहे. कोलकाता संघाचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे. विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या हैदराबाद संघाला कोलकाताविरोधात संघात बदल करावा लागणार आहे. हैदराबादच्या वॉशिंगटन सुंदरला दुखापतीमुळे कोलकाताविरोधातील सामन्याला मुकावे लागणार आहे. वॉशिंगटन सुंदरची कमी हैदराबाद संघाला जाणवणार आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. पण यावेळी दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकेल? हे सांगणं कठीण आहे. 

सनराइजर्स हैदराबादचा संघ:
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम, निकोलस पूरण, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, रोमेरियो शेफर्ड, मार्को जेनसन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारूकी, उमरान मलिक, टी नटराजन.

कोलकाता नाइट राइडर्स: 
फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर(कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.

23:11 PM (IST)  •  15 Apr 2022

SRH vs KKR Match Live Update : राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी, हैदराबादचा सात विकेटनं विजय

SRH vs KKR Match Live Update : सनरायजर्स हैदराबादने सात विकेटनं कोलकात्याचा पराभव केला.

23:06 PM (IST)  •  15 Apr 2022

SRH vs KKR Match Live Update : मार्करमची अर्धशतकी खेळी

SRH vs KKR Match Live Update :  मार्करम याने आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मार्करमने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले

22:54 PM (IST)  •  15 Apr 2022

SRH vs KKR Match Live Update : आंद्रे रसेलनं त्रिपाठीला केले बाद, हैदराबादला तिसरा धक्का

SRH vs KKR Match Live Update :    आंद्रे रसेलनं धोकादायक राहुल त्रिपाठीला बाद करत कोलकात्याला तिसरं यश मिळवून दिले. राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावांची खेळी केली. हैदराबादला विजयासाठी 34 चेंडूत 43 धावांची गरज

22:32 PM (IST)  •  15 Apr 2022

SRH vs KKR Match Live Update : राहुल त्रिपाठीचं वादळ, 21 चेंडूत झळकावलं अर्धशतक

SRH vs KKR Match Live Update :   हैदराबादच्या राहुल त्रिपाठीनं कोलकात्याच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. राहुल त्रिपाठीने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. राहुल त्रिपाठीने चार चौकार आणि चार षटकारासह अर्धशतक झळकावलं.

22:21 PM (IST)  •  15 Apr 2022

SRH vs KKR Match Live Update : हैदराबादची विस्फोटक सुरुवात, पण कोलकात्यानं दोघांना पाठवलं तंबूत

SRH vs KKR Match Live Update :  कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने दणक्यात सुरुवात केली. सात षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात हैदराबादने 70 धावा केल्या

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget