IPL 2022 : राजस्थानमधून बोल्ट बाहेर, तर गुजरातमधूनही दोघांना वगळले, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
RR vs GT, IPL 2022 : आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. या दोन्ही संघाने आतापर्यंत तीन तीन सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
RR vs GT, IPL 2022 : संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. या दोन्ही संघाने आतापर्यंत तीन तीन सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राजस्थानचा आयपीएलमधील हा पाचवा सामना आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली आहे. याआधी झालेल्या चारही सामन्यात संजू सॅमसन याने नाणेफेक गमावली होती. राजस्थानच्या संघात एक बदल कऱण्यात आला आहे. राजस्थानने भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्टला दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे. बोल्टच्या जागी राजस्थानने जिमी निशमला संधी दिली आहे. तर गुजरात संघातही महत्वाचे दोन बदल कऱण्यात आले आहेत. निलकंडे आणि साई सुदर्शन यांना हार्दिक पांड्याने प्लेइंग 11 मधून वगळले आहे. त्यांच्या जागी यश दयाल आणि विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे.
राजस्थान संघाची प्लेईंग 11 -
जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकिपर), रॅसी वॅन डेर डुसेन, शिमरोन हेटमायर, रियान पराग, जिमी निशम, आर अश्विन, यजुवेंद्र चाहल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
गुजरातच्या संघाचे अंतिम 11 खेळाडू -
शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, अभिनवर मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी, यश दयाल
A look at the Playing XI for #RRvGT
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
Live - https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL https://t.co/MgBjbwAVA5 pic.twitter.com/SdmTvLh4ba
राजस्थान-गुजरातची ताकद अन् कमजोरी काय?
राजस्थानच्या संघाकडून फलंदाजीची धुरा जोस बटलरवर याच्यावर असणार आहे. तर शिम्रॉन हेटमायर हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार असणार आहे. तर रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत. तर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे. तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया देखील चांगली खेळी करत आहे. सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फग्र्युसन, मोहम्मद शमी असा वेगवान गोलंदाज गुजरातकडे आहेत. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.