RR vs DC, 1st innings : आश्विनच्या अर्धशतकाने सावरला राजस्थानचा संघ, दिल्लीसमोर 161 धावाचं लक्ष्य
IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोघांत सामना रंगला असून राजस्थानने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयासाठी 161 धावांचे आव्हान दिले आहे.

RR vs DC : यंदाच्या आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आज 58 वा सामना पार पडत असून सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) हे दोन्ही संघ आमने-सामने आहेत. सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी बऱ्यापैकी सार्थ ठरवत राजस्थानला 160 धावांत रोखलं आहे. राजस्थानकडून दिग्गज फलंदाज बटलर, संजू स्वस्तात माघारी परतले असले तरी रवी आश्विन आणि पडिक्कल यांच्या खेळीने संघाला किमान 160 धावापर्यंत नेलं आहे. त्यामुळे आता दिल्लीसमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य आहे.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाला यंदाच्या हंगामात तीन शतकं लगावणाऱ्या जोस बटलरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बटलर 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर वन डाऊन थेट आश्विन मैदानात अवचरला आणि त्याने संघाटा डाव एकहाती सावरला. दुसऱ्या बाजूने यशस्वी, संजू हे महत्त्वाचे फलंदाज बाद होत होते. पण आश्विनने टिकून राहत 38 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूत 48 धावांची तुफान खेळी करत संघाचा डाव 160 पर्यंत नेला. 20 षटकानंतर सहा गडी गमावत राजस्थानने 160 धावा केल्या असून आता दिल्लीसमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान आहे.
दिल्लीकडून साकरियाची उत्तम गोलंदाजी
दिल्लीच्या साऱ्याच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. यावेळी चेतन साकरिया, ए नॉर्खिया आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर चेतनने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये केवळ 23 धावा केल्या आहेत. तर अक्षर पटेलला सर्वाधिक धावा पडल्या असून त्याला दोन षटकात 25 धावा आल्या आहेत.
हे देखील वाचा-
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : खराब फॉर्मवर विराट कोहलीकडून एका वाक्यात टीकाकारांना उत्तर, म्हणाला..
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
