RCB on Virat Kohli Wicket: विराटला चुकीच्या पद्धतीनं आऊट देण्याच्या निर्णयावर आरसीबीची मोठी प्रतिक्रिया
RCB on Virat Kohli Wicket: बंगळुरू आणि मुंबई (RCB Vs MI) यांच्यात पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (MCA) आयपीएल 2022 चा आठरावा सामना खेळण्यात आला.
RCB on Virat Kohli Wicket: बंगळुरू आणि मुंबई (RCB Vs MI) यांच्यात पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (MCA) आयपीएल 2022 चा आठरावा सामना खेळण्यात आला. या सामन्यात बंगळुरूच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईचा पराभव केलाय. या सामन्यात मुंबईचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसनं त्याच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला एलबीडब्लू केलं. त्यावर विराटनं थर्ड अंपायरकडं दाद मागितली. थर्ड अंपायरच्या रिप्लेमध्ये बॉल एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. मात्र, तरीही विराट कोहलीला आऊट घोषित करण्यात आलं. विराट कोहलीला आऊट देण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. यावर आरसीबीनं मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आरसीबीनं काय म्हटलं?
बंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विराटला आऊट देण्याच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केलं आहे. आरसीबीनं केलेल्या ट्विटमध्ये असं लिहण्यात आलं आहे की, 'आम्ही एलबीडब्ल्यू निर्णयासाठी क्रिकेट एमसीसी नियमांचं वाचन करत आहोत. हे दुर्दैव आहे की, विराट कोहली चांगली खेळी करत असताना त्याला निराश होऊन माघारी परतावं लागलं.
पंचाच्या निर्णयावर विराट कोहली नाराज
दरम्यान, विराट कोहलीनं आऊट देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अर्धशतकापासून 2 धावा दूर असताना त्याला चुकीच्या निर्णायाचं शिकार व्हावं लागलं. ज्यामुळं त्याला राग अनावर झाल्याचं सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. विराटनं बॅट जमिनीवर मारली. आरसीबीच्या डगआऊटमध्येही तो संतापलेला दिसत होता.विराटच्या या विकेटचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले आहेत.
बंगळुरूचा मुंबईवर सात विकेट्सनं विजय
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत आणि सात विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.
हे देखील वाचा-
- KKR vs DC, Match Live Updates : पृथ्वी शॉ बाद, डेव्हिड वार्नरसह ऋषभ पंत क्रिजवर
- KKR vs DC, Toss Update : कोलकात्याने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा आजची अंतिम 11
- KKR vs DC, Pitch Report : कोलकाता-दिल्ली आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?