IPL 2022 : बंगळुरु संघाने मोडला कोलकात्याचा नकोसा विक्रम, क्वॉलीफायरमध्ये पोहोचूनही ओढवली 'ही' नामुष्की
IPL 2022 : बंगळुरु संघाने लखनौला मात देत क्वॉलीफायर 2 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. पण याचदरम्यान त्यांनी एक नकोसा रेकॉर्डही केला आहे.
RCB in IPL 2022 : आयपीएल 2022 (Ipl 2022) मध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरुने (RCB) कमाल कामगिरी करत क्वॉलिफायर 2 मध्ये धडक घेतली आहे, त्यामुळे केवळ एक विजय आणि अंतिम सामन्यात पोहोचतील. त्यांनी बुधवारी एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपरजायंट्स (RCB vs LSG) संघाला 14 धावांनी मात दिली. पण याच वेळी त्यांनी एक नकोसा रेकॉर्डही नावे केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार आरसीबी संघाविरुद्ध पडले आहेत. याआधी 2018 मध्ये हा रेकॉर्ड कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) नावावर होता. त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी संघानी 135 षटकार लगावले होते. पण यंदा आरसीबीविरुद्ध प्रतिस्पर्धी संघानी आतापर्यंत 137 षटकार ठोकले आहेत.
आरसीबीचा हा लाजिरवाणा रेकॉर्ड लखनौ संघाची फलंदाजी सुरु असताना 17 व्या षटकात झाला. आरसीबीचा स्पिनर वानिंदु हसरंगा 17 वी ओव्हर फेकत होता. त्याचवेळी ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लखनौचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) IPL 2022 मधील RCB विरुद्धचा 136 वा षटकार उडवला. त्यामुळे केकेआरच्या 135 षटकारांचा रेकॉर्ड यावेळी तुटला. त्यानंतर हर्षल पटेलच्या षटकातही एक षटकार आल्याने या सामन्याअखेर आरसीबीविरुद्ध एकूण 137 षटकार प्रतिस्पर्धी संघाचे पूर्ण झाले.
14 धावांनी लखनौ पराभूत
नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला.
हे देखील वाचा-