Rajasthan Royals Team Preview: फलंदाजी- गोलंदाजी मजबूत, पण ऑलराऊंडर आणि फिनिशरबाबत राजस्थानचा संघ कसा?
Rajasthan Royals Team Preview: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा पहिला खिताब जिंकलेल्या राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याठी सज्ज झालाय.
Rajasthan Royals Team Preview: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा पहिला खिताब जिंकलेल्या राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याठी सज्ज झालाय. राजस्थानच्या संघ युवा खेळाडूंवर अधिक अवलंबून आहे. राजस्थानच्या संघाला गेल्या काही हंगामापासून आयपीएलच्या टॉप 4 मध्येही जागा मिळवता आली नाही. मात्र, यावेळी राजस्थानचा संघ खूप मजबूत दिसत आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहे. परंतु, संघात ऑलराऊंडर आणि फिनिशर नसणं राजस्थानसाठी अडचणी निर्माण करू शकते.
राजस्थानची फलंदाजी आणि गोलंदाजी कशी?
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थानच्या संघानं अनेक उत्कृष्ट खेळाडूंना संघात सामील करून घेतलंय. यशस्वी जयस्वालपासून ते जॉस बटलर आणि संजू सॅमसनसारखे खेळाडून संघाच्या टॉप ऑर्डरचा भाग आहेत. तर, शिमरॉन हिटमायर आणि नीशम यांच्यावर अखेरच्या षटकात वेगानं धावा करण्याची जबाबदारी असेल. राजस्थानकडं अश्विन आणि चहल हे दोन्ही फिरकीपटूचा संघाला मोठा फायदा होणार आहे. तर, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी वेगवान गोलंदाज म्हणून आपली जबाबदारी संभाळणार आहे.
संघात ऑलराऊंडर आणि फिनिशरची कमतरता
राजस्थानचा संघ मजबूत आहे. परंतु, संघात ऑलराऊंडर आणि फिनिशरची कमतरता आहे. जिमी निशम व्यतिरिक्त राजस्थानजवळ ऑलराऊंडरच्या रुपात दुसरा पर्याय नाही. यामुळं सामना फिनिश करण्याची जबाबदारी निशमवर असणार आहे. जर काही कारणास्तव जिमी निशम संघाबाहेर गेल्यास राजस्थानचा संघ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तसेच संघाचे योग्य संयोजन करणे हे देखील संजू सॅमसनसमोर मोठं आव्हान असणार आहे. संघाकडे बटलर, जयस्वाल,सॅमसन आणि पडिक्कल या चार सलामीवीर आहेत. यापैकी कोण डावाची सुरुवात करेल? हा मोठा प्रश्न असेल.
या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष
राजस्थानच्या संघावर असे काही खेळाडू आहेत, जे स्वबळावर सामने जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. जॉस बटलर, संजू सॅमसन आणि हेटमायर यांची आयपीएलमधील वादळी खेळी सर्वांनीच पाहिली आहे. त्याचबरोबर ट्रेंट बोल्ट, अश्विन आणि चहल या खेळाडूंमध्ये आपल्या गोलंदाजीनं आयपीएलमध्ये अनेक सामने फिरवले आहेत.
राजस्थानचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सैमसन (कर्णधार, विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, करुण नायर, जिमी नीशम, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्सचे शिलेदार
संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी), रवीचंद्रन आश्विन (5 कोटी), ट्रेण्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडिक्कल (7.75 कोटी), प्रसिध कृष्णा (10 कोटी), युजवेंद्र चहल (6.50 कोटी), पराग रियान (3.8 कोटी), केसी करिअप्पा (30 लाख), नवदीप सैनी (2.60 कोटी), महिपाल लोमरोर (95 लाख), ओबेद मेकॉय (75 लाख), चामा मिलिंद (25 लाख), अनुनयसिंग (20 लाख).
हे देखील वाचा-
- IPL 2022 : कधी काळी खेळण्यावर बंदी; आता CSKचा 'सर' बनला रॉकस्टार जाडेजा
- यंदा कोण जिंकणार आयपीएल, कोणता संघ राहणार तळाशी? सुनील गावस्करांनी सांगितली मन की बात
- Mumbai Indians Team Preview : यंदाही दम दाखवणार का?, सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई यंदा कशी खेळणार? काय असेल रणनीती?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha