IPL 2022, GT vs RR : अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला मिळणार? गुजरात-राजस्थान मैदानात उतरणार, कधी, कुठे पाहाल सामना?
आज आयपीएलमधील (IPL 2022) पहिला क्वॉलीफायर सामना खेळण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) हे संघ मैदानात उतरणार आहेत.
GT vs RR : आज यंदाच्या आयपीएल (IPL 2022) स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारा एक संघ आपल्या सर्वांसमोर येणार आहे. आज होणारा पहिला क्वॉलीफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या संघात पार पडणार आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने दोघांमध्ये पहिला क्वॉलीफायर सामना खेळवला जात आहे. दोघांतील विजेता संघ थेट अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. दरम्यान हा अत्यंत महत्त्वाचा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 24 मे रोजी होणारा गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी
आज पार पडणाऱ्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात जाईल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार नसून संबधित संघाला एक आणखी संधी मिळेल. हा संघ बुधवारी होणाऱ्या लखनौ आणि बंगळुरु यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत सामना खेळेल. लखनौ-बंगळुरु सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार असून विजेता संघ आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाशी 27 मे रोजी सामना खेळेल, ज्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहचणारा दुसरा संघ असेल.
हे देखील वाचा-