IPL 2022: दे दणादण! आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, एका हंगामात लागले 'इतके' षटकार
IPL 2022: चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2022 चा 62 वा सामना खेळला जात आहे.
IPL 2022: चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2022 चा 62 वा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात नवा विक्रम घडला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 873 षटकार लागले आहेत. आयपीएलच्या बाराव्या हंगामात एकूण 872 षटकार लागले होते. विशेष म्हणजे, या हंगामातील आणखी 12 सामने खेळायचे आहेत. यामुळं यंदाच्या हंगामातील षटकरांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 मध्ये 616 षटकार लागले होते. तर, 2009 मध्ये 442 पाहायला मिळाले होते. त्यानंतर 2010 मध्ये 582, 2011 मध्ये 638, 2012 मध्ये 727, 2013 मध्ये 674, 2014 मध्ये 714, 2015 मध्ये 692, 2016 मध्ये 638, 2017 मध्ये 705, 2018 मध्ये 872, 2019 मध्ये 784, 2020 मध्ये 734, 2021 मध्ये 687 षटकार ठोकण्यात आले होते. आयपीएलमध्ये 2018 मध्ये सर्वाधिक 872 षटकार लागले होते. परंतु, यंदाच्या हंगामातील अजून 12 सामने शिल्लक राहिले असताना 873 हून अधिक षटकार लागले आहेत.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार-
आयपीएलचा हंगाम | षटकार |
2008 | 616 |
2009 | 442 |
2010 | 582 |
2011 | 638 |
2012 | 727 |
2013 | 674 |
2014 | 714 |
2015 | 692 |
2016 | 638 |
2017 | 705 |
2018 | 872 |
2019 | 784 |
2020 | 734 |
2021 | 687 |
2022 | 873 षटकारांचा टप्पा ओलांडला... |
कोणत्या संघानं आयपीएलच्या किती ट्रॉफी जिंकल्या?
सध्या आयपीएलचा पंधरावा हंगाम खेळला जात आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघानं सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर चेन्नईच्या संघाचा क्रमांक लागतो. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या चार ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सनं आणि हैदराबादच्या संघानं दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत.
हे देखील वाचा-
IPL 2022: 'उमरान मलिकनं माझा विक्रम मोडला तर...' श्रीनगर एक्स्प्रेसबाबत शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य