(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs CSK : भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या रॉबिन उथप्पा विक्रमांचा चौकार लगावण्याची संधी
Robin Uthappa Records : रॉबिन उथप्पा यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2022) तुफान फॉर्ममध्ये आहे. उथप्पाने (Robin Uthappa) चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघाकडून खेळताना दमदार प्रदर्शन केले आहे.
Robin Uthappa Records : रॉबिन उथप्पा यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2022) तुफान फॉर्ममध्ये आहे. उथप्पाने (Robin Uthappa) चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघाकडून खेळताना दमदार प्रदर्शन केले आहे. चेन्नई आज कट्टर प्रतिस्पर्धी मुंबईशी (Mumbai Indians) दोनहात करणार आहे. या सामन्यात रॉबिन उथप्पाला चार विक्रम करण्याची संधी आहे.
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअममध्ये चेन्नई आणि मुंबईमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच उथप्पा मोठा विक्रम करणार आहे. रॉबिन उथप्पा आज आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळणार आहे. उथप्पाने आयपीएल करिअरमध्ये 199 सामन्यात 28.10 च्या सरासरीने 4919 धावा चोपल्या आहेत.
आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा उथप्पा सातवा खेळाडू होणार आहे. एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित सर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांनी आयपीएलमध्ये 200 सामने खेळले आहेत. यांच्या पंक्तीत बसण्याचा मान उथप्पाला मिळणार आहे.
या विक्रमांनाही घालणार गवसणी -
मुंबईविरोधात 81 धावांची खेळी करताच रॉबिन उथप्पा 5000 धावांचा टप्पा पार करणार
47 धावा करताच ख्रिस गेलचा धावांचा विक्रम मोडणार आहे. आयपीएलमध्ये गेलच्या नावावर 142 सामन्यात 4965 धावा आहेत. यादरम्यान गेलने 6 शतक आणि 31 अर्धशतके झळकावली आहे. उथप्पाने आआयपीएल करिअरमध्ये 27 अर्धशतकं लगावली आहेत.
उथप्पाला आयपीएलमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही. जर उथप्पाने पाच हजार धावांचा टप्पा पार केला तर एकही शतक न झळकावता पाच हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.
यंदाची उथप्पाची कामगिरी -
रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईकडून खेळणाऱ्या उथप्पाने यंदा आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. चेन्नईसाठी उथप्पाने आतापर्यंत दोन अर्धशतकं झळकावली आहेत. उथप्पाने सहा सामन्यात 197 धावा चोपल्या आहेत. 152.71 च्या स्ट्राईक रेटने उथप्पाने धावांचा पाऊस पाडलाय.
हे देखील वाचा-
- MI vs CSK: मुंबईविरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का, 'करो या मरो'च्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही
- Kuldeep Yadav: मनं जिंकलीस भावा! 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार घेताना कुलदीप यादव नक्की काय म्हणाला?
- Arjun Tendulkar च्या यॉर्करने लक्ष्य भेदलं, IPL 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू अवाक् झाला!