MI vs CSK: मुंबईविरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का, 'करो या मरो'च्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही
IPL 2022 MI vs CSK: मुंबईच्या (Mumbai) डीवाय स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) मुंबई इंडियन्स आणि चेन्नईच्या संघ आयपीएल 2022 चा 33 वा सामना खेळणार आहेत.
IPL 2022 MI vs CSK: मुंबईच्या (Mumbai) डीवाय स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) मुंबई इंडियन्स आणि चेन्नईच्या संघ आयपीएल 2022 चा 33 वा सामना खेळणार आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीचं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असताना चेन्नईचा संघाला मोठा धक्का लागला आहे. चेन्नईचा स्टार खेळाडू डी. कॉन्वे (Devon Conway) मुंबईविरुद्ध सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तो मायदेशी परतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉनवे त्याच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेत गेला आहे. तिथे गेल्यानंतर तो त्याची मंगेतर किमशी लग्न करणार आहे. तो आज मुंबईविरुद्धच्या सामन्यातून बाहेर असेल. मात्र, 25 एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी कॉनवे संघात पुनरागमन करणार आहे. नुकतंच मुंबईतील एका हॉटेलमध्ये कॉनवेच्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चेन्नईच्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. ज्यात महेंद्रसिंह धोनीसह अनेक खेळाडूंनी धमाल केली.
मुंबई-चेन्नईची खराब कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई आणि चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. तर, चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचं आव्हान संपुष्टात येणार आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी खराब ठरली आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे.
हे देखील वाचा-
- MI vs CSK: आज जसप्रीत बुमराहवर असणार सर्वांची नजर, चेन्नईविरुद्ध रचणार मोठा विक्रम
- Kuldeep Yadav: मनं जिंकलीस भावा! 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार घेताना कुलदीप यादव नक्की काय म्हणाला?
- IPL Points Table 2022 : आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टॉपवर; ऑरेंज आणि पर्पल कॅपवर राजस्थानचा कब्जा