Kuldeep Yadav: मनं जिंकलीस भावा! 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार घेताना कुलदीप यादव नक्की काय म्हणाला?
Kuldeep Yadav: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 32 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Panjab Kings Vs Delhi Capitals) आमने- सामने आले.
Kuldeep Yadav: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 32 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Panjab Kings Vs Delhi Capitals) आमने- सामने आले. दिल्ली कॅपिटल्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झालेली असतानाही त्यांनी पंजाबला 9 विकेट्स राखून सहज पराभूत केलं. आजच्या सामन्यात पंजाब संघ चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र, पंजाबचा डाव अवघ्या 115 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिट्लसने अवघ्या 11 षटकांत सान्यावर आपलं नाव कोरलं. दिल्लीच्या विजयात चायना मॅन कुलदीप यादवनं महत्वाची भूमिका बजावली. ज्यामुळं त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार घेताना कुलदीप यादवनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांची मन जिंकली आहे. कुलदीप यादव नेमकं काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
दिल्लीच्या संघानं मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअम आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. या तिन्ही सामन्यात कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. मात्र, पंजाबविरुद्ध सामन्यात त्यानं हे श्रेय अक्षर पटेलसोबत वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
व्हिडिओ-
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीच्या संघानं पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाब फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजासमोर गुडघे टेकले. पंजाबानं 20 षटकात सर्वबाद 115 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघानं 11 व्या षटकात हे लक्ष्य पूर्ण करत 9 विकेट्सनं हा सामना जिंकला.
हे देखील वाचा-
- IPL Points Table 2022 : आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टॉपवर; ऑरेंज आणि पर्पल कॅपवर राजस्थानचा कब्जा
- Kieron Pollard retirement : मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
- DC vs PBKS, Match Highlights : दिल्लीची विजयाच्या दिशेने वेगवान वाटचाल, वॉर्नर-शॉची तुफान खेळी