MI vs CSK Match Live Update : धोनीने मारले, मुंबईचा पराभव, चेन्नईचा तीन विकेटनं विजय
IPL 2022, MI vs CSK Match Live Update : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने, रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांच्यात होणार सामना
LIVE
Background
IPL 2022, MI vs CSK Match Live Update : आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) आज (गुरूवार) आमनेसामेने येणार आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आतापर्यंत पाच वेळा तर चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. पण यंदा या दोन्ही संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईला सलग सहा सामन्यात तर मुंबईला आतापर्यंत पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेंकासमोर उभे राहतील.
मुंबईसाठी सर्वात मोठी चिंता कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म आहे. रोहित शर्माला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी कामगीर करता आलेली नाही. रोहितने सहा सामन्यात फक्त 114 धावा काढल्या आहेत. मुंबई मोठी धावसंख्या उभा करायची असल्यास अथवा धावांचा पाठलाग करायचा असल्यास रोहित शर्माची फलंदाजी महत्वाची आहे. कायरन पोलार्ड, इशान किशन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15.5 कोटी रुपयात खरेदी केलेल्या ईशान किशनने सहा सामन्यात दोन अर्धशतकाच्या मदतीने 191 धावा चोपल्यात. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव चांगल्या लयीत आहेत. मात्र, त्यांना इतर फलंदाजांकडून साथ मिळत नाही. फलंदाजीसोबत मुंबईची गोलंदाजीही कमकुवत जाणवत आहे. बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात अथवा धावा रोखण्यात यश आलेलं नाही. टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बासिल थंपी आणि मुरुगन अश्विन यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही.
चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये परतला आहे. गायकवाडने गुजरातविरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी आरसीबीविरोधात तुफानी फलंदाजी केली होती. चेन्नईची चिंतेची बाजू म्हणजे अंबाती रायुडू आणि मोईन अली यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जाडेजालीही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. राहुल चाहरच्या अनुपस्थितीत चेन्नईची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. ड्वेन ब्रावो आणि स्पिनर महेश तीक्ष्णा यांचा अपवाद वगळता चेन्नईच्या गोलंदाजांना भेदक मारा करण्यात अपयश आलेय.
हेड टू हेड रेकॉर्ड
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी खराब ठरली आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे.
MI vs CSK Match Live Update : धोनीने मारले, चेन्नईचा तीन विकेटनं विजय
MI vs CSK Match Live Update : धोनीने अखेरच्या षटकात 17 धावा मारत चेन्नईला तीन विकेटनं सामना जिंकून दिला.
MI vs CSK Match Live Update : चेन्नईला सातवा धक्का, विजयासाठी पाच चेंडूत 17 धावांची गरज
MI vs CSK Match Live Update : सहा चेंडूत 17 धावांची गरज असताना चेन्नईला प्रिटोरिसच्या रुपाने सातवा धक्का बसला आहे. प्रिटोरिसने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. चेन्नईला विजयासाठी पाच चेंडूत 17 धावांची गरज
MI vs CSK Match Live Update : सहा चेंडूत 17 धावांची गरज
MI vs CSK Match Live Update :चेन्नईला विजयासाठी सहा चेंडूत 17 धावांची गरज आहे. प्रिटोरिस आणि धोनी मैदानावर आहेत.
MI vs CSK Match Live Update : चेन्नईला मोठा धक्का, कर्णधार रविंद्र जाडेजा बाद
MI vs CSK Match Live Update :रायली मॅरिडेथनं रविंद्र जाडेजाला बाद करत मुंबईला सहावं यश मिळवून दिलेय. जाडेजा तीन धावा काढून तंबूत परतला.
MI vs CSK Match Live Update : चेन्नईचा अर्धा संघ तंबूत, रायडू बाद
डॅनिअल सॅम्सने जम बसलेल्या रायडूला बाद करत मुंबईला पाचवं यश मिळवून दिले. रायडू 40 धावा काढून माघारी परतला. डॅनिअल सॅम्सने चौथी विकेट घेतली.