(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC Vs MI: अक्षर पटेलची तुफान फलंदाजी, दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय
DC Vs MI: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलंय.
DC Vs MI: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलंय. मुंबईच्या संघानं दिलेल्या 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून विजय मिळवला आहे. दिल्लीच्या विजयात अष्टपैलू अक्षर पटेलनं मोलाचा वाटा उचलला आहे. त्यानं 17 चेंडूत 38 धावांची वादळी खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला आहे. या विजयानंतर दिल्लीच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत.
मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी उतरले. त्यानंतर दोघांनीही मैदानावर आपली पकड जमवली असून दोघेही संयम राखून खेळी दाखवली. परंतु, मुंबईचा संघ 28 धावांवर असताना रोहित शर्माच्या रुपात त्यांना पहिला झटका लागला. रोहित शर्मा 41 धावा करून बाद झाला. रोहित शर्मापाठोपाठ तिलक वर्माही बाद झाला. त्यावेळी मुंबईचा स्कोर 14 षटकांत 118 धावा झाल्या आहेत. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी करण्यासाठी मैदानात आलेल्या किरॉन पोलार्डला मोठी धावसंख्या करता आली नाही. किरॉन पोलार्ड फक्त आठ धावा करून माघारी परतला. दरम्यान, ईशान किशनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईनं 20 षटकात पाच विकेट्स गमावून दिल्लीसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवलं. ईशान किशन 48 चेंडूत 81 धावा केल्या. दिल्लीकडून मुरगन अश्विन, बेसील थम्पी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. तर, टायमल मिल्सला एक विकेट्स मिळाली आहे.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि टीम सेफर्ट संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र दिल्लीच्या अवघ्या 30 धावा असताना टी सेफर्ट बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंहही बाद होऊन माघारी परतला. पुढे दोन धावा केल्यानंतर दिल्लीचा ऋषभ पंतच्या रुपात आणखी एक फलंदाज बाद झाला. दरम्याम, 32 धावांवर दिल्लीच्या संघानं तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर मात्र पृथ्वी शॉने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तीन विकेट्स गेल्यानंतर रॉवमन पॉवेल मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंही शून्यावर आपली विकेट्स गमावली. त्यानंतर शार्दुल ठाकूरही 22 धावा करून झेलबाद झाला. शार्दुल बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दिल्लीकडून अक्षर पटेलनं 17 चेंडूत 38 धावा केल्या. तर, ललित यादवनं 38 चेंडूत 48 धावा केल्या. ज्यामुळं दिल्लीच्या संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.
हे देखील वाचा-
- Sindhu wins Swiss Open : सिंधूने इतिहास रचला! स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली
- DC Vs MI: अक्षर पटेलची तुफान फलंदाजी, दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय
- DC vs MI: इलेक्ट्रिशियनचा मुलगा कसा बनला क्रिकेटर? वाचा मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माच्या संघर्षाची कहाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha