IPL 2022: आयपीएलदरम्यान आणखी एका क्रिकेटपटूचं निधन, क्रिकेट चाहत्यांना एकाच आठवड्यात दुसरा धक्का!
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम रंगतदार स्थितीत आल्याचं पाहायला मिळत आहे. या हंगामातील 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स एकमेकांशी भिडणार आहे.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम रंगतदार स्थितीत आल्याचं पाहायला मिळत आहे. या हंगामातील 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) एकमेकांशी भिडणार आहे. याचदरम्यान, क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे.मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्मा (Rajesh Verma) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. राजेश वर्मा 2006 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा सदस्य होते.
राजेश वर्मा यांचं रविवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. राजेश वर्मा हे अवघ्या 40 वर्षांचे होते. मुंबईचा माजी क्रिकेटपटू भाविन ठक्कर यांनी राजेश वर्माच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा दिला. राजेश वर्मा यांच्या निधनामुळं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज आणि 2006-07 रणजी करंडक विजेते संघाचे सदस्य होते.
राजेश वर्मा यांची कारकिर्द
राजेश वर्मानं त्यांच्या कारकिर्दीत केवळ सात प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यानं 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 2008 साली ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला. त्यानं सात सामन्यांत 23 विकेट्स घेतले आहेत. याशिवाय 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 20 विकेट्सची नोंद आहे.
ट्वीट-
माजी क्रिकेटपटू समिउर रहमान याचं मंगळवारी निधन
भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या लीग आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू असताना क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू समिउर रहमान याचं आज निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ब्रेन ट्यमूरच्या आजारानं ग्रस्त होते. ज्याची माहिती या वर्षाच्या सुरुवातीला समोर आली होती.
हे देखील वाचा-
- IPL 2022: कोलकात्याविरुद्ध सामन्यात स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिकची पत्नी नताशा! पाहा व्हिडिओ
- LSG vs MI: अर्जून तेंडूलकर पदार्पण करणार? लखनौ- मुंबईची अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन
- IPL 2022 Playoffs: प्लेऑफच्या सामन्यांसाठी ठिकाण ठरलं! प्रेक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत रंगणार लढती, पाहा संपूर्ण वेळापत्रक