IPL 2022: कोलकात्याविरुद्ध सामन्यात स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिकची पत्नी नताशा! पाहा व्हिडिओ
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरातच्या संघानं दहशत निर्माण केली आहे. या हंगामात गुजरातच्या संघानं सात पैकी सहा सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरातच्या संघानं दहशत निर्माण केली आहे. या हंगामात गुजरातच्या संघानं सात पैकी सहा सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर काल गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 8 धावांनी धुळ चाखली. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्तांकोविकचा (Natasa Stankovic) एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होत आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावून कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. मात्र, या सामन्यात कोलकात्याची सुरुवात खराब झाली. कोलकात्याचा सलामीवीर सॅम बिलिंग्सनं पहिल्याच षटकात त्याची विकेट गमावली. त्यानंतर या सामन्यातील तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्यानं मोहम्मद शामीच्या हातात चेंडू सोपावला. या षटकातील दुसरा चेंडूत सुनील नारायणनं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट-थर्ड क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल पकडला. सुनील नारायण बाद झाल्यानंतर हार्दिकची पत्नी नताशा स्टँडमध्येच नाचायला लागली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
कोलकाताविरुद्ध हार्दिकची दमदार खेळी
या सामन्यात गुजरातचा कर्णधार आपल्या अंदाजात खेळताना दिसला. या सामन्यात त्यानं 49 चेंडूत 67 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्यानं 4 चौकार आणि 2 षटकारही मारले. मात्र, या सामन्यात त्यानं गोलंदाजी केली नाही. मात्र, त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्या उभारली.
कोलकात्यानं थोडक्यात सामना गमावला
सामन्यात दोन्ही संघानी उत्तम कामगिरी केली. यावेळी आंद्रे रस्सेल याने अप्रतिम अष्टपैलू खेळीचं दर्शन घडवलं खरं पण अखेरच्या षटकात तो निर्धारित लक्ष्य गाठू न शकल्याने केकेआरने थोडक्यात सामना गमावला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर 20 षटकात 148 धावाच करु शकला.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-