Deepak Chahar: चेन्नईच्या संघाला मोठा धक्का, दीपक चाहर आयपीएल 2022 मधून बाहेर?
IPL 2022 Deepak Chahar: आयपीएलच्या पंधराव्या हंगाम चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत.
IPL 2022 Deepak Chahar: आयपीएलच्या पंधराव्या हंगाम चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत. यातच चेन्नईच्या संघाला अडचणीत आणखी भर घालणारी माहिती समोर आलीय. चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चाहर आयपीएल 2022 बाहेर झाल्याचं वृत्त प्रसार माध्यमांत झळकत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. एका दुखापतीतून सावरणारा दीपकला पुनर्वसनाच्या वेळी आणखी एक दुखापत झाली आहे. ज्यामुळं या हंगामातून त्याला मुकावं लागणार आहे, असंही सांगितलं जात आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईनं दीपक चाहरला 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तो आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. दरम्यान, दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. ज्यामुळं त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावं लागलंय. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाठीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं यंदाच्या हंगामात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातंय. दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. दीपक चाहरचं आयपीएलमधून बाहेर जाणं चेन्नईच्या संघासाठी मोठा धक्का असेल.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 22 व्या सामन्यात चेन्नईचा संघ आरसीबीशी भिडणार आहे. या हंगामात चेन्नईच्या संघाला एकही सामना जिंकला आलेला नाही. तर, बंगळुरूच्या संघानं चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीचा संघ आतापर्यंत 28 वेळा आमने- सामने आले आहेत. त्यापैकी चेन्नईच्या संघानं 18 सामने जिंकले आहेत. तर, 9 वेळा पराभव स्वीकारला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित ठरला आहे. आजच्या सामन्यात बंगळुरूला पराभूत करून या हंगामातील पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशानं चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा-