IPL 2022: आयपीएलमधील सर्वात खतरनाक संघ कोणता? ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाजानं सांगितलं नाव
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आतापर्यंत 20 सामने खेळले गेले आहेत. तर, 21 वा सामना हैदराबाद आणि गुजरात यांच्यात मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सुरु आहे.
Matthew Hayden Picks ‘Red Hot’ Team Of IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आतापर्यंत 20 सामने खेळले गेले आहेत. तर, 21 वा सामना हैदराबाद आणि गुजरात यांच्यात मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सुरु आहे. या हंगामात अनेक संघानं उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप सोडली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडननं सध्या सर्वात धोकादायक वाटणाऱ्या संघाचे नाव सांगतिलं आहे. यासोबतच या संघाला पराभूत करण्यासाठी उर्वरित 9 संघांना जोरदार तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले आहेत. आतापर्यंत प्रत्येक संघानं किमान तीन-तीन सामने खेळले आहेत. दरम्यान, क्रिकेट पंडित आता संघांची ताकद आणि कमकुवतपणाचे विश्लेषण करण्यात तसेच विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वात बलाढ्य संघांची नावे देण्यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर मॅथ्यू हेडननं या हंगामात कोणता संघ विजेतेपद पटकावणार? याची भविष्यवाणी केली आहे.
मॅथ्यू हेडन काय म्हणाले?
"तुमचा संघ जितका चांगला असेल तितकाच चांगल्या पद्धतीनं तुम्ही खेळू शकतात. यंदाच्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गुजरातचा सलामीवीर सुरूवातीपासूनच नियंत्रणात खेळताना दिसतोय. तसेच गोलंदाजीही उत्कृष्ट गोलंदाजी करत विरुद्ध संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या मते गुजरात हा असा संघ आहे, ज्याला पराभूत करण्यासाठी इतर संघ विचार करत असतील. गुजरात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गुजरातच्या संघानं ज्याप्रकारे पंजाबच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला आहे, ज्यामुळं त्यांचा विश्वास आणखी वाढला आहे"
गुजरातनं पंजाबच्या तोंडातून विजयी घास हिसकावला
पंजाबविरुद्ध सामन्यात गुजरातनं सहा विकेट्सनं राखून विजय मिळवला. या विजयात गुजरातचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियानं मोलाची भूमिका बजावली. ज्यामुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अखेरच्या षटकात गुजरातच्या संघाला 19 धावांची गरज होती. त्यावेळी सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत होता. परंतु, मैदानात आलेल्या राहुल तेवतियानं तीन चेंडूत 13 धावा करत गुजरातला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-
- What Is Retired Out: रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये नेमका फरक काय? राजस्थान आणि लखनौ सामन्यात घडली ऐतिहासिक गोष्ट
- IPL 2022, RR vs LSG: युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेणारा ठरला सहावा गोलंदाज
- RR Vs LSG: भरमैदानात युजवेंद्र चहल पंचाशी भिडला! संजू सॅमसनला करावा लागला हस्तक्षेप, पाहा व्हिडिओ