![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
CSK vs SRH : चेन्नई विरुद्ध हैदराबाद, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा, कशी असेल अंतिम 11, कुठे पाहाल सामना?
अव्वल दर्जाचे खेळाडू असूनही स्पर्धेत एकही विजय मिळवता न आल्याने आज चेन्नई आणि हैदराबाद हे दोन्ही संघ पहिल्या विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.
![CSK vs SRH : चेन्नई विरुद्ध हैदराबाद, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा, कशी असेल अंतिम 11, कुठे पाहाल सामना? IPL 2022, CSK vs SRh : When & Where To Watch Live Streaming, Telecast Of Chennai Superkings vs sunrisers hyderabad know probable 11 for todays match CSK vs SRH : चेन्नई विरुद्ध हैदराबाद, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा, कशी असेल अंतिम 11, कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/63a768dded8b0a08f8cafc69c92a6235_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CSK vs SRH : आयपीएलमधील आजच्या सामन्यात दाक्षिणात्या सुपरसंघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोन्ही संघामध्ये होणाऱ्या आजच्या लढतीच्या निकालानंतर दोघांपैकी कोणतातरी एक संघ विजयाचे खाते नक्कीच खोलणार आहे. कारण आयपीएलमधील ताकदवर संघ चेन्नईला यंदा पहिल्या तीन पैकी तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर हैदराबादही दोन पैकी दोन सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना आज विजयाची नितांत गरज आहे.
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण दोन्ही संघाना आतापर्यंत पराभव पत्करावा लागल्याने आज संघामध्ये नक्कीच काही बदल होण्याची दाट शक्यता आहे.
चेन्नई संभाव्य अंतिम 11
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएश धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, डी. ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस
हैदराबाद संभाव्य अंतिम 11
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समाद, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन
कधी, कुठे पाहाल सामना?
आजचा हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
- IPL 2022: राहुल तेवतियानं सामना फिरवला, गुजरातचा 6 विकेट्सनं विजय; लियाम लिव्हिंगस्टोन आक्रमक खेळी व्यर्थ
- IPL 2022: गुजरातविरुद्ध सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनची बॅट तळपली; सर्वात जलद अर्धशतक ठोकून वेधलं सर्वांचं लक्ष
- Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)