IPL 2022 : आयपीएलसाठी काम करणाऱ्या ग्राऊंड्समनला 25 लाखांचे बक्षीस, बीसीसीआयचा मोठा निर्णय
IPL 2022v: आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय... गुजरातने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली.
IPL 2022v: आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय... गुजरातने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात गुजरातपुढे राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान होते. या सामन्यात राजस्थानने फलंदाजी करत 20 षटकांत 130 धावा केल्या. त्या धावांचा पाठलाग करत गुजरातने 18.1 षटकात 7 विकेट्स राखून सामना जिंकला. तब्बल दोन महिने आयपीएलचा रनसंग्राम चालला.. यामध्ये 70 पेक्षा जास्त सामने खेळले गेले.. आयपीएल यशस्वी होण्यामागे ग्राऊंड्समन आणि क्युरेटर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच बीसीसीआयने त्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतलाय. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याची घोषणा केली.
आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेटियम आणि बेब्रॉन स्टेडियम पार पडले होते. तर प्ले ऑफचे सामने ईडन गार्डन्स स्टेडियम आणि गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पार पडले. हे सामने उत्कृष्टरित्या पार पाडल्याबाबत बीसीसीआयने क्युरेटर आणि ग्राउंड्समनसाठी बक्षीस जाहीर केले आहे. याबाबतची माहिती बीबीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करुन दिली आहे.
वानखेडे स्टेडिअम, ब्रेबॉन स्टेडिअम, डी वाय पाटील स्टेडिअम आणि पुण्यातील एमसीए स्टेडिअमच्या ग्राऊंड्समन आणि क्युरेटर यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर ईडन गार्डन आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील ग्राऊंड्समन आणि क्युरेटरला 12 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
पाहा जय शाहा यांचे ट्वीट -
BCCI announces a prize money of Rs 1.25 crores for the curators and groundsmen across 6 IPL venues this season - Rs 25 lakhs each for CCI, Wankhede, DY Patil and MCA, Pune and Rs 12.5 lakhs each for Eden Gardens and Narendra Modi Stadium, tweets BCCI Secretary Jay Shah#IPL2022 pic.twitter.com/Il0feU26oa
— ANI (@ANI) May 30, 2022
हे देखील वाचा-