IPL : हार्दिकची भन्नाट कामगिरी.. पाच वेळा फायनल खेळला अन्...
Hardik Pandya IPL : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या फायनल सामन्यात गुजरातने बाजी मारली. गुजरातने राजस्थानचा पराभव करत आयपीएल चषकावर नाव कोरले.
Hardik Pandya IPL : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या फायनल सामन्यात गुजरातने बाजी मारली. गुजरातने राजस्थानचा पराभव करत आयपीएल चषकावर नाव कोरले. यासह आयपीएलला सहावा विजेता मिळलाय. पंधरा वर्षात सहावा आयपीएल विजेता मिळालाय. हार्दिक पांड्याने पाचव्यांदा चषक उंचावलाय. आयपीएल 2022 च्या आधी गुजरात संघाने हार्दिक पांड्याला ड्राफ्टमध्ये घेतले होते. याआधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पांड्याने मोक्याच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार फायनल सामने खेळले होते. रविवारी पाचवा आयपीएल सामनाही हार्दिक पांड्याने जिंकलाय.
हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये 2015 मध्ये पहिला फायनल सामना खेळला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. चेन्नईचा संघ 161 धावांत गारद झाला होता. पांड्याने आयपीएलचा दुसरा फायनल 2017 मध्ये खेळला.. हा सामना पुणेबरोबर होता. हा सामना मुंबईने एका धावेनं जिंकला होता. पांड्याने तिसरा फायनल सामना 2019 मध्ये खेळला. हा सामनाही मुंबईने अवघ्या एका धावेनं जिंकला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर दाखल चेन्नईचा संघ 148 धावांपर्यंत पोहचला होता. हार्दिक पांड्याने चौथा आयपीएल फायनल सामना दिल्लीच्या विरोधात खेळला होता. या सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.
हार्दिक पाचव्यांदा विजयी संघाचा ठरला भाग
हार्दिक पांड्या याआधी मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. मुंबईनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यातील चार ट्रॉफी जिंकताना हार्दिक मुंबईच्या संघाचा सदस्य होता. यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, "माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की, मी पाचवेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे आणि प्रत्येक वेळी विजयी संघाचा भाग ठरलो आहे."
हार्दिक पांड्याचं दमदार प्रदर्शन
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्यानं त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला आहे. या हंगामात त्यानं तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी केली आहे. हार्दिक पांड्यानं या हंगामात 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंड्याचा स्ट्राइक रेट 131.27 होता. तर, सरासरी 44.27 होती. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत हार्दिक पांड्या चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय या हंगामात त्यानं आठ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.