Axar Patel Vs Kuldeep Yadav: अक्षर पटेलसाठी अडथळा ठरू शकतो कुलदीप यादव, दिग्गजांनी मांडलं मत
Axar Patel Vs Kuldeep Yadav: आयपीएलच्या पंधरावा हंगाम दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसाठी खास ठरत आहे.
Axar Patel Vs Kuldeep Yadav: आयपीएलच्या पंधरावा हंगाम दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसाठी खास ठरत आहे. या हंगामात दिल्लीच्या संघानं आठ पैकी चार सामने जिंकले आहेत. या चारही सामन्यात कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. तर, दुसरीकडं दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. याचदरम्यान, दिग्गजांनी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या कामगिरीची तुलना करत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
यंदाच्या हंगामात कुलदीप यादवनं दिल्लीकडून आठ सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 17 विकेट्स घेतले आहेत. एवढेच नव्हेतर, पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, कोलकाताविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात कुलदीप यादवनं त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करून दाखवलं आहे. या सामन्यात त्यानं तीन षटक टाकून कोलकाताच्या चार फलंदाजाला माघारी धाडलं आहे. तर, या सामन्यात अक्षर पटेलनं चार षटक टाकून 28 धावा देत एक विकेट्स घेतला. विशेष म्हणजे अक्षरनं यंदाच्या हंगामात आठ सामने खेळले आहेत. ज्यात त्याला केवळ चार विकेट्स घेता आल्या आहेत.
निखिल चोपडा काय म्हणाला?
नॉट जस्ट क्रिकेट शोमध्ये बोलताना अक्षर पटेल म्हणाला की, "आयपीएलच्या मागच्या हंगामात कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजेनं पहिल्या काही षटकात दिल्लीला विकेट्स मिळवून दिले होते. ज्यामुळं विरोधी संघाची मधली फळीचे फलंदाज संयमीनं खेळताना दिसले. मात्र, यंदाच्या हंगामात शार्दुल ठाकूर आणि मुस्ताफिजुर रेहमान सुरुवातीला दिल्लीच्या संघाला विकेट्स मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. फलंदाजांनी अक्षर पटेलविरुद्ध धावा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा तुम्हाला नव्या चेंडूनं विकेट्स मिळत नाही, त्याचा परिणाम सामन्यावर होतो."
वसीम जाफर म्हणतोय...
“मला वाटते की हे सर्व मानसिकतेबद्दल आहे, कारण अक्षर पटेल सध्या बचावात्मक गोलंदाजी करत आहे आणि फक्त डॉट बॉल मिळवण्यासाठी गोलंदाजी करत आहे. पण कधी कधी धाडसी व्हावं लागतं आणि विकेट्स घ्याव्या लागतात. जर तुम्ही चार षटकात फक्त 20 धावा दिल्या. परंतु एकही विकेट घेतल्या नाहीत तर फलंदाज इतर गोलंदाजांविरुद्ध धावा करू शकतात. त्यानं कुलदीप यादवसारखी गोलंदाजी करायला हवी. ज्याचा फायदा संघाला होईल.
हे देखील वाचा-
- PBKS vs LSG: पंजाबविरुद्ध लखनौचे दोन अष्टपैलू खेळाडू रचणार विक्रम
- Danish Kaneria On Shahid Afridi: शाहिद आफ्रिदी कॅरेक्टरलेस! माजी क्रिकेटर दानिश कनेरियाचे गंभीर आरोप, क्रिडाविश्वात खळबळ
- Umran Malik: 500 रुपयांसाठी एक एक मॅच खेळली, आता आयपीएलमध्ये सर्वात घातक गोलंदाजी, लवकरच टीम इंडियात एन्ट्री करणार?