IPL 2022 : वादग्रस्त अंबाती रायडू, कधी सहकारी खेळाडू तर कधी बीसीसीआयसोबत वाद
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणाऱ्या अंबाती रायडूनं शनिवारी अचानक निवृत्तीबद्दल ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. पण काही वेळातच रायडूनं त्याची पोस्ट डिलीट केली.

Ambati Rayudu controversies : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणाऱ्या अंबाती रायडूनं शनिवारी अचानक निवृत्तीबद्दल ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. पण काही वेळातच रायडूनं त्याची पोस्ट डिलीट केली.
रायडूनं ट्विटमध्ये काय लिहलं होतं?
“हा माझा शेवटचा आयपीएलचा हंगाम असेल हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. या लीगमध्ये खेळताना आणि 13 वर्षांपासून 2 मोठ्या संघांचा एक भागासह खूप चांगला वेळ घालवला आहे. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मनापासून आभार मानायला आवडेल."
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांचं स्पष्टीकरण
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, अंबाती रायडू निवृत्त होत नाहीये. कदाचित तो त्याच्या कामगिरीवर खूश नसेल. ही फक्त एक मानसिक गोष्ट आहे. तो त्याचा आयपीएलचा प्रवास चेन्नईसोबत सुरू ठेवेल.
सीएसकेच्या सीईओच्या या विधानामुळं हे स्पष्ट होते की रायुडू अद्याप निवृत्त होत नाही. परंतु त्यानं ही पोस्ट का केली? हा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अद्याप मिळालेले नाही. अंबातू रायडूची क्रिकेट करिअर वादग्रस्त राहिलेय. सिनिअर खेळाडूंपासून थेट बीसीसीआयपर्यंत अंबाती रायडूने पंगा घेतलाय.
वादग्रस्त रायडूची -
अंबाती रायुडूच्या नेतृत्वात सुरेश रैना, इरफान पठान, आरपी सिंह आणि दिनेश कार्तिक यासारखे दिग्गज फलंदाज खेळले आहेत. अंबाती रायडूने भारताच्या अंडर 19 संघाचे कर्णधारपद सांभाळलेय. तरीही अंबाती रायडूला भारतीय संघात आपली जागा पक्की करता आली नाही. अंबाती रायडू बीसीसीआयविरोधात असणाऱ्या ICL सोबत जोडला होता...त्यानंतर रायडूवर बीसीसीआयने काही वर्षांची बंदी घातली होती. 2006 मध्ये हैदराबादचा सहकारी खेळाडू अर्जन यादव याच्यासोबत मैदानावर वाद घातला होता. तसेच आयपीएलमध्ये सहकारी खेळाडू हरभजन सिंह याच्यासोबत तू तू मैं मैं केले होते. 2019 च्या विश्वचषकात निवड न झाल्यानंतर अंबाती रायडूने अचानक निवृत्ती घेतली होती.. पण नंतर निवृत्तीचा निर्णय माघार घेतली होता... त्यानंतर पुन्हा त्याची भारतीय संघात निवड झाल नव्हती.
वयोवृद्धासोबत वादाचा आरोप -
2018 मध्ये अंबाती रायुडूचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये अंबाती रायडू एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत वाद घालत असल्याचे दिसत होते. अंबाती रायडू वेगाने गाडी चालवत होता... त्यावेळी वयोवृद्ध व्यक्तीला गाडीचा धक्का लागला होता.. त्यानंतर दोघांमध्ये तू तू मैं मैं झाले होते. त्यावेळी रायडू त्या व्यक्तीला मारण्यासाठी गेला होता..
रायडूची आयपीएलमधील कामगिरी
रायुडूनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 187 सामने खेळले आहेत आणि 29 च्या सरासरीनं 3 हजार 290 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात रायडूला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं 12 सामन्यात केवळ 271 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
