Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोयाबीन दराच्या मुद्यावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही मार्ग काढू असं ते म्हणाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा शेवटचा आठवडा बाकी आहे. राज्यातील कापूस आणि सोयाबीन दराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा बनला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी योग्य दर मिळत नसल्यानं संकटात आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा बनत चाललाय. हिंगोली जिल्ह्यातील सेनेगावमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाजप नेते पाशा पटेल यांना सोयाबीनच्या दराबाबत प्रश्न विचारले होते. सोयाबीनच्या दराचा मुद्दा आता प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. कारण, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा हाती घेतला आहे.
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादकांसोबत संवाद
राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं हताश आणि निराश आहे. सोयाबीनच्या एका क्विंटलची किंमत 2021 मध्ये 10 हजार रुपये होती. आता शेतकरी एमएसपीपेक्षा कमी दरानं सोयाबीन विकत आहेत. सोयाबीनचा हमीभाव 4892 रुपये असू शेतकऱ्यांना त्याची विक्री 4200 रुपये क्विंटलनं करावी लागत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. काही शेतकऱ्यांना यापेक्षा कमी दर मिळतो. चांगलं उत्पादन घेऊनही योग्य दर नं मिळाल्यानं सोयाबीन शेतकरी त्रस्त असल्याचं राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या अडचणींना समजून घेते. आमचं सरकार बनल्यानंतर योग्य दर देण्यासाठी मार्ग काढू असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी झुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी समृद्धी योजनेद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल, अशी गॅरंटी राहुल गांधींनीदिली. याशिवाय महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळतील, असं राहुल गांधी म्हणाले.
सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादकांसमोर अनेक आव्हान आहेत. मला माहिती आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देत नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की करु, असं राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्र के सोयाबीन और कपास के किसान भाजपा की किसान विरोधी नीतियों के कारण हताश और निराश हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 12, 2024
सोयाबीन की कीमतें 2021 में 10,000 रुपए तक थीं लेकिन अब किसान MSP से भी कम दाम में बेचने को मजबूर हैं। सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 4,892 रुपए है लेकिन किसानों को 4,200 रुपए के… pic.twitter.com/BTkKQR9nLF
दरम्यान, सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्रस्थानी येऊ लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सोयाबीनच्या मुद्यावरुन सरकारवर हल्ला चढवला होता. त्यांनी सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांनाही हमीभाव नाही. त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गच संतप्त आहे. पेटलेला बळीराजा मतदानाच्या दिवशी महायुती सरकारला चांगलाच धडा शिकवणार, असं म्हटलं होतं.
इतर बातम्या :