(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Umran Malik: "उमरान मलिकच्या गोलंदाजीचा सामना करणं म्हणजे..." त्याच्याच संघातील खेळाडू काय म्हणतोय? एकदा बघाच!
Umran Malik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Umran Malik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात भारताचा युवा खेळाडू उमरान मलिकच्या नावाचा समावेश आहेत. त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आयपीएलमध्ये स्वत:ची छाप सोडली आहे. त्यानं आपल्या गोलंदाजीच्या वेगानं अनेक फलंदाजाला थक्क केलं आहे. आयपीएलमध्ये तो सतत 145 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी करताना दिसत आहे. यातच हैदराबादचा खेळाडू ग्लेन फिलिप्सनं उमरान मलिकच्या गोलंदाजीबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय.
दरम्यान, ग्लेन फिलिप्स म्हणाला की, "उमरान मलिक खूप वेगानं गोलंदाजी करतो. नेट्समध्ये त्याच्या गोलंदाजीवर खेळताना एका भयानक स्वप्नासारखं वाटतं. दुखापतीपासून वाचण्यासाठी मला चेस्ट गार्ड लावावं लागतं. सामन्यादरम्यान त्याच्या गोलंदाजीवर खेळताना फलंदाज काय विचार करत असेल." ग्लेन फिलिप्स हा हैदराबाद संघाचा भाग आहे. मात्र, त्याला अद्याप हैदराबादकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. फिलिप्स त्याच्या 360 डिग्री फलंदाजीसाठी ओळखला जातो.
उमरान मलिकवर कौतुकाचा वर्षाव
उमरान मलिकनं आपल्या वेगानं अनेक दिग्गजांना वेड लावलं आहे. रवी शास्त्री आणि डेल स्टेन यांनी त्याचं कौतुक केलं आहे. उमरान मलिकला लवकरच टीम इंडियात स्थान मिळेल, असा विश्वास भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलाय विश्वास आहे. याशिवाय, स्टेनही त्याच्या वेगामुळं खूप प्रभावित झाला आहे.
पंजाबविरुद्ध अखेरच्या षटकात उमरान मलिकची दमदार कामगिरी
पंजाब आणि हैदराबाद यांच्यात आयपीएल 2022 चा 28वा सामना खेळण्यात आला. या सामन्यातील अखेरच्या षटकात उमरान मलिकनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं हे षटक निर्धाव टाकत तीन विकेट्स मिळवले. उमरान मलिकच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादनं पंजाबच्या संघाला 151 धावांवर रोखलं. या सामन्यात उमराननं चार षटक टाकून 28 धावा दिल्या. ज्यात एक निर्धाव षटक होतं.
हे देखील वाचा-
- RR vs KKR: राजस्थान- कोलकाता सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार; संजू सॅमसन, सुनील नारायण 'हे' खेळाडू रचणार इतिहास
- GT Vs CSK: राशीद खान- डेव्हिड मिलरची वादळी खेळी, चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला, गुजरातचा 3 विकेट्सनं विजय
- PBKS vs SRH, IPL 2022: हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवन पंजाबचा कर्णधार; मयांक अग्रवाल संघाबाहेर, नेमकं कारण काय?