एक्स्प्लोर

IPL 2021 Captain Salary: विराट कोहली ते महेंद्रसिंह धोनी... आयपीएलमधील कर्णधारांना किती मानधन मिळतं?

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक किमतीला विकला गेला. राजस्थान रॉयल्सने त्याला 16.25 कोटीमध्ये खरेदी केले.

IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो, त्याच प्रकारे, दरवर्षी खेळाडूंवर पैशाचा वर्षाव होतो. या लीगने जगभरातील अनेक क्रिकेटपटूंना करोडपती केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक किमतीला विकला गेला. राजस्थान रॉयल्सने त्याला 16.25 कोटीमध्ये खरेदी केले. यासह, तो या लीगच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू बनला. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचा पगार त्यांच्यापेक्षा अजूनही जास्त आहे. या वेळी सर्व संघांच्या कर्णधारांचा पगार किती आहे हे जाणून घेऊया.

विराट कोहली आयपीएलचा सर्वात महागडा कर्णधार

आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा भाग आहे. त्याला आयपीएल 2008 च्या लिलावात आरसीबीने अवघ्या 12 लाख रुपयांत विकत घेतल होतं. पण आयपीएल 2021 साठी कोहलीला 17 कोटी रुपये मिळणार आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावे आहेत.

IPL Auction 2021 | आयपीएल लिलाव - कोणासाठी जॅकपॉट तर कोणासाठी तारणहार, कोणत्या खेळाडूला किती बोली?

रोहित आणि धोनीचा पगार समान आहे

रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2021 मध्ये रोहितला 15 कोटी रुपये मिळतील. तर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने तीन वेळा आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला आयपीएल 2021 मध्ये 15 कोटी रुपये मिळणार आहेत.

श्रेयस अय्यर स्वस्त कर्णधार

दिल्ली कॅपल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा सर्व संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वात कमी पगार आहे. दोन वर्षांपासून तो दिल्लीचं नेतृत्व करत आहे. मागील हंगामात त्याने आपल्या नेतृत्वात दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत नेले. अय्यरला आयपीएल 2021 मध्ये 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

डेविड वॉर्नर आणि केएल राहुलचं मानधन

केएल राहुलला पंजाब किंग्जने आयपीएल 2020 मध्ये संघाचा कर्णधार बनवले. 2018 मध्ये राहुल या संघात आला होता. गेल्या तीन मोसमात राहुल आपल्या संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2021 मध्ये राहुलला 11 कोटी रुपये मिळतील.

डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा आघाडीचा फलंदाज आहे. या लीगमध्ये तीन वेळा सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली आहे. वॉर्नरला आयपीएल 2021 मध्ये 12.50 कोटी रुपये मिळतील.

संजू सॅमसन आणि इऑन मॉर्गन किती पैसे मिळतात?

इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने आयसीसी 2019 एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. इयान मॉर्गनला गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. आयपीएल 2021 मध्ये मॉर्गनला 5.25 कोटी रुपये मिळतील.

तर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 च्या लिलावात तो दिल्ली संघात आला होता, मात्र आयपीएल 2018 च्या लिलावात तो पुन्हा राजस्थान संघात परतला. राजस्थानने आयपीएल 2021 साठी सॅमसनला आपला कर्णधार बनवले आहे. या हंगामात त्याला आठ कोटी मिळतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget