IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या टीम रूमची वर्च्युअल सफर; MI पलटनची प्रॅक्टिस सुरु, 19 सप्टेंबरला चेन्नईशी लढत
IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा संघ 13 ऑगस्टलाच अबू धाबीमध्ये दाखल झाला आहे. 6 दिवसांचा क्वॉरंटाईनचा काळ पूर्ण केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघानं प्रॅक्टिस सुरु केली आहे.
IPL 2021 : यूएई आणि ओमानमध्ये आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे IPL 2021 रद्द करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयनं आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. आता आयपीएलचा दुसरा टप्पा, म्हणजेच, उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नई आणि मुंबई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. पाच वेळा आयपीएल चषक जिंकलेला मुंबई इंडियन्सचा संघ 13 ऑगस्टलाच अबू धाबीमध्ये दाखल झाला आहे. 6 दिवसांचा क्वॉरंटाईनचा काळ पूर्ण केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघानं प्रॅक्टिस सुरु केली आहे. रविवारी मुंबई इंडियन्सनं चाहत्यांना आपल्या 'नए टीम रूम'चं वर्च्युअल दर्शन घडवलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन जारी करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सच्या वतीन जारी करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "वन फॅमिली MI च्या आठवणी, ही आमची नवी टीम रुम, पलटन." मुंबई इंडियन्सची ही टीम रुम खूपच सुंदर दिसत आहे. इथे खेळाडूंसाठी बिलीयर्डस, टेबल टेनिस आणि व्हिडीओ गेम्ससह इतरही अनेक सोयीसुविधा आहे. याव्यतिरिक्त या खोलीच्या भिंतीवर संघांतील माजी आणि आजी सर्व खेळाडूंचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव मात्र यूएईमध्ये उपस्थित नाहीत. सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात या तिघांचाही समावेश करण्यात आलेला आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर हे तिघेही आयपीएलसाठी यूएईमध्ये दाखल होणार आहेत.
मुंबई इंडियन्सकडून प्रॅक्टिसचा व्हिडीओ शेअर
मुंबई इंडियन्सनं 21 ऑगस्टला त्यांच्या सरावाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत लिहिलं आहे की, "55 सेकंदांमध्ये पाहा प्रॅक्टिसचा पहिला दिवस. तुमचे मोटिफिकेशन्स ऑन ठेवा आणि आमच्यासोबत राहा."
मुंबई इंडियन्सच्या या व्हिडीओमध्ये ईशान किशन, धवल कुलकर्णी, जयंत यादव आणि आदित्य तारे प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. त्यासोबतच कोच जहीर खान आणि रॉबिन सिंहही दिसत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :