IPL 2021, MI vs CSK : IPL 21 पुन्हा 19 सप्टेंबरपासून सुरु होणार, मुंबई-चेन्नईत होणार पहिला सामना
कोरोनामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
IPL 2021 Phase 2 Schedule: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 चं 14 वं सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाने प्रवेश केल्यामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
पहिला सामना मुंबई आणि चेन्नईत
आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळवले जाणारा आहेत, असं सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये खेळला जाईल.
10 ऑक्टोबर रोजी पहिला क्वॉलिफायर सामना
मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएल 2021 चा पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला खेळला जाईल. हा सामना दुबईमध्ये होईल. यानंतर 11 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे एलिमिनेटर सामना खेळला जाईल. त्याच बरोबर दुसरा क्वॉलिफायर सामना त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले सामने
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलली होती. यानंतर बीसीसीआयने सांगितले होते की ते आयपीएलचे उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये आयोजित केले जातील. पुढे ढकलण्यापूर्वी आयपीएलचे एकूण 29 सामने भारतात झाले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल दरम्यान अखेरचा सामना खेळला गेला होता. त्यात दिल्लीने 7 विकेट्सने विजय मिळवला होता.
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून झाली होती. आयपीएल 14 चा पहिला टप्पा मुंबई आणि चेन्नई येथे झाला होता. दिल्ली-अहमदाबादला स्थानांतरित होईपर्यंत ही स्पर्धा अतिशय यशस्वीरीत्या चालू होती. 1 मे रोजी बायो बबल ब्रेक झाला आणि एकाच वेळी अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. परिणामी बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.