IPL 2021 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केकेआरचा नितीश राणा, तर पर्पल कॅपसाठी आंद्रे रसेल सर्वात पुढे
IPL 2021 : आयपीएल 2021च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केकेआरचा नितीश राणा पहिल्या स्थानावर आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत केकेआरचा आंद्रे रसेल अव्वल आहे.
IPL 2021 : आयपीएल 2021 मध्ये मंगळवारी मुंबई आणि कोलकाता यांच्यात रंलेल्या सामन्यात मुंबईने धमाकेदार खेळी करत केकेआरचा 10 धावांनी पराभव केला. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. तसेच केकेआरकडून नितीश राणाने 47 चेंडूंमध्ये सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. राणाने पहिल्या सामन्यातही धमाकेदार खेळी करत 80 धावांची खेळी केली होती. राणाने आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील दोन सामन्यांमध्ये 137 धावा केल्या आहेत. सध्या केकेआरचा नितीश राणा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत राणानंतर दुसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात 119 धावांची खेळी केली होती. या लिस्टमध्ये पंजाब किग्जमधील केएल राहुल एका सामन्यात 91 धावांच्या खेळीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबईचा सूर्यकुमार यादव दोन सामन्यांत 87 धावांसह चौथ्या आणि दिल्लीचा शिखर धवन एका सामन्यातील 85 धावांसह पाचव्या स्थानी आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत केकेआरचा आंद्रे रसेल सर्वात पुढे
पर्पल कॅपबाबत बोलायचं झालं तर या शर्यतीती केकेआरचा आंद्रे रस्सल सर्वात पुढे आहे. आंद्रे रस्सलने दोन सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतले आहेत. रस्सलने काल मुंबई विरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतले. तसेच मुंबईसोबतच्या पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा हर्षल पटेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हर्षलकडे आजच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रस्सलला मागे टाकण्याची संधी आहे. कालच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवून देणारा राहुल चहर दोन सामन्यांमध्ये चार विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पेंट कमिंस (3 विकेट्स) आणि चेतन सकारिया (3 विकेट्स) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबई
पॉईंट टेबलमध्ये केकेआर विरुद्धचा सामना जिंकत मुंबई पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचली होती. मुंबईच्या खात्यात दोन सामने खेळल्यानंतर दोन पॉईंट्स आहेत. तर दिल्लीने एक सामना खेळून दोन पॉईंट्स मिळवले आहेत. दिल्ली उत्तम रन रेटच्या आधारावर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत पंजाब तिसऱ्या क्रमांकावर, केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तर काही संघांनी अद्याप आपलं खातं उघडलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :