IPL 2021 : दुबईत 17 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आयपीएलचे उर्वरित सामने; सूत्रांचा दावा
IPL 2021 : आयपीएल (IPL 2021) च्या चौदाव्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्यापासून झाली होती. सुमारे 25 दिवस ही स्पर्ध यशस्वीरित्या आयोजित करण्यात बीसीसीआयला यश आलं. परंतु संघ अहमदाबाद आणि दिल्ली पोहोचल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सीझनमधील उर्वरित सामने 17 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, बीसीसीआयची काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली होती. त्या बैठकीत आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या चौदाव्या मोसमावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर सरले आहेत. शनिवारी आयपीएल 2021 च्या आयोजनासंदर्भात एक महत्त्वाची बैठक बीसीसीआयनं बोलावली होती. दरम्यान, यंदा आयपीएलचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्यापासून झाली होती. सुमारे 25 दिवस ही स्पर्ध यशस्वीरित्या आयोजित करण्यात बीसीसीआयला यश आलं. परंतु संघ अहमदाबाद आणि दिल्ली पोहोचल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौदाव्या सीजनमधले 31 सामने शिल्लक
बीसीसीआयने दोन सामने टाळल्यानंतर अखेर 3 मे रोजी चौदावा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मोसमात साखळी फेरी आणि प्ले ऑफ असे एकूण 60 सामने होते. ही स्पर्ध स्थगित होईपर्यंत 29 सामने खेळवण्यात आले होते तर आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळवले जातील.
बीसीसीआयने आयपीएल सीजन 14 चे उरलेले सामने खेळवले नसते तर त्यांना सुमारे 3 हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं असतं. दरम्यान ही स्पर्धा कधीपासून सुरु होणार याच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयपीएलमधील शिल्लक राहिलेले सामने खेळवण्यात येतील.
20 ते 22 दिवसांत आटोपणार स्पर्धा
आयपीएलचे उरलेले सामने 20 ते 22 दिवसांचा वेळापत्रक आखून त्यादरम्यान पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. डबल हेडर स्वरुपात सामन्यांचं आयोजन करण्यावर भर दिला जाणार असून या मार्गानं स्पर्धा लवकरात लवकर संपवण्यात येईल.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केल्यानुसार संघातील महत्त्वाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकानुसारच पुढील गोष्टींना प्राधान्य देतील. त्यामुळं इंग्लंडच्या संघातील जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, सॅम करन हे खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकत नाहीत कारण त्यादरम्यानच त्यांच्या संघाचे सामने पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांशी होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :