आंद्रे रसेलने याआधीही अखेरच्या षटकात केली होता भेदक मारा, मुंबईविरोधातील सामना आठवतोय?
Andre Russell IPL : कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने गुजराजविरोधात अखेरच्या षटकात भेदक मारा केला. या षटकात रसेलनं चार विकेट घेत धुमाकूळ घातला.
Andre Russell IPL : कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने गुजराजविरोधात अखेरच्या षटकात भेदक मारा केला. या षटकात रसेलनं चार विकेट घेत धुमाकूळ घातला. रसेलच्या भेदक माऱ्यामुळे गुजरातच्या संघाला 160 धावाही करता आल्या नाहीत. रसेलनं 20 व्या षटकात चार विकेट घेतल्या. पण रसेलनं अखेरच्या षटकात पहिल्यांदाच भेदक मारा केला नाही. याआधीही रसेलनं असा कारनामा केलाय. 2021 मध्ये आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रसेलने असाच कारनामा केला होता.
13 एप्रिल 2021 रोजी मुंबई आणि कोलकातामध्ये सामना झाला होता. 152 धावांत मुंबईचा संघ ऑलआऊट झाला. रसेलनं अखेरच्या षटकात धमाल केली होती. रसेलनं अखेरच्या षटकात तीन विकेट घेतल्या होत्या. हा सामना मुंबईने जिंकला होता, पण रसेलची कामगिरीने लक्ष वेधलं होतं. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या 56 धावांच्या फलंदाजीच्या जोरावर 152 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने दोन षटकात पाच विकेट घेतल्या होत्या. 153 धावांचा आव्हान पार करताना नितीश राणाच्या दमदार अर्धशतकानंतरही कोलकात्याला सामना गमावावा लागला होता. राहुल चाहरने चार विकेट घेत कोलकात्याचा विजय हिसकावून आणला होता.
आज काय झालं?
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पांड्याच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. पण रसेलच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचा संघ ढेपाळला. गुजारतच्या संघाने 157 धावांपर्यंत मजल मारली. रसेलनं अखेरच्या षटकात चार बळी घेतले. रसेलने पहिल्या चेंडूवर अभिवन मनोहरला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लॉकी फर्गुसनला तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या चेंडूवर अल्जारी जोसेफनं एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर राहुल तेवातियाने चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर तेवातियाला बाद केलं. सहाव्या चेंडूवर यश दयाल यालाही बाद केले. अखेरच्या षटकात रसेलने पाच धावा देत चार विकेट घेतल्या.
रसेलच्या नावावर मोठा विक्रम -
आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेणारा रसेल पहिला वेगवान गोलंदाज झाला आहे. याआधी एकाही गोलंदाजाला एका षटकात चार विकेट घेण्याचा कारनामा करता आलेला नाही. दोन फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 2013 मध्ये अमित मिश्राने पुण्याविरोधात एकाच षटकात चार विकेट घेतल्या होत्या. तर यंदा चाहलने केकेआरविरोधात चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.