IPL 2020 | प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीचे दमदार शॉट्स; रायडू आणि वॉटसनचीही धमाकेदार खेळी
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे खेळाडू गेल्या 6 महिन्यांपासून मैदानावर उतरलेले नाहीत. त्यामुळे आयपीएलच्या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिस आणि फिटनेस यासाठी सर्व संघ जवळपास एक महिन्यााधीच दुबईत दाखल झाले होते. तसेच सर्व खेळाडू आपापसांत प्रॅक्टिस मॅचेसही खेळताही दिसून येत आहेत.
मुंबई : 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या 13व्या सीझनला यूएईमध्ये सुरुवात होत आहे. या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे खेळाडू गेल्या 6 महिन्यांपासून मैदानावर उतरलेले नाहीत. त्यामुळे आयपीएलच्या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिस आणि फिटनेस यासाठी सर्व संघ जवळपास एक महिन्यााधीच दुबईत दाखल झाले होते. तसेच सर्व खेळाडू आपापसांत प्रॅक्टिस मॅचेसही खेळताही दिसून येत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने प्रॅक्टिस मॅचचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू सहभागी झाले होते. प्रॅक्टिस मॅच दरम्यान, धोनी, वॉटसन आणि रायडू धमाकेदार शॉट्स खेळताना दिसून आले. या मॅचमध्ये जडेजा, डु प्लेसिस, पीयुष चावला, शार्दुल ठाकूरही दिसून आले होते.
A complete #YelloveGame when the Kings Clash! #WhistlePodu ???????? pic.twitter.com/QxRfeqXmdP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 15, 2020
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने गेल्या 14 महिन्यांपासून एकही सामना खेळलेला नाही. परंतु, प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीने ज्याप्रकारे धमाकेदार शॉर्ट्स लगावले, ते पाहून असा अंदाजा लावूच शकतो की, मैदानापासून इतके दिवस दूर असूनही धोनीच्या खेळीवर काहीच परिणाम झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रायडूदेखील क्लासी शॉट्स खेळताना दिसत आहे.
Bigil ft. Thala! #WhistlePodu ???? @TheMuthootGroup pic.twitter.com/RZs9qZSQVu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 16, 2020
धोनीच्या संघाला मोठा दिलासा; 'या' स्टार खेळाडूची संघात वापसी
दरम्यान, दुबईत पोहोचल्यानंतर आयपीएलमधील स्टार संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला अनेक धक्क्यांचा सामना करावा लागला. सीएसकेमधील खेळाडूंसह काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. परंतु, क्वॉरंटाईनचा काळ पूर्ण केल्यानंतर संघाने आयपीएलसाठी कंबर कसली आहे. अशातच संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आयपीएलमधून माघार घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तसेच दिग्गज स्पिनर हरभजन सिंहने देखील वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या 13 व्या सीझनमधून माघार घेतली.
सीएसकेने रैनाच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी देण्याची इच्छा आहे. परंतु, 20 दिवसांनंतरही अद्याप या खेळाडूचा कोरोना व्हायरस अहवाल नेगेटिव्ह आलेला नाही. तसेच दीपक चहर कोरोनामुक्त झाल्यानंतर संघासोबत प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ...म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा
- IPL संघांना मोठा धक्का, सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू
- IPL 2020 | आधी चेन्नई आता दिल्ली.... दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव
- IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह
- IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक
- IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!