(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 KXIP Schedule | पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब सज्ज; संघाचं संपूर्ण वेळापत्रक
आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये पहिल्यांदाच विजेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब सज्ज आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी दुबईतील मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे.
IPL 2020 KXIP Schedule : आयपीएलच्या 13व्या हंगामात पहिल्यांदाच विजेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबने आपली कंबर कसली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने या सीझनमध्ये आपल्या संघात अनेक मोठे बदल केले आहेत. दिग्गज खेळाडू अश्विनच्या स्थानी केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी दुबईतील मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ससोबत अबूदाबीच्या मैदानावर लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना खेळणार आहे.
क्रमांक | टीम | तारीख | वेळ | ठिकाण |
1 | दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 20 सप्टेंबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
2 | रॉयल चॅलेंजर्स बैंग्लोर वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 24 सप्टेंबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
3 | राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 27 सप्टेंबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | शारजाह |
4 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियंस | 01 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी7:30 | अबू धाबी |
5 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स | 04 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
6 | सनराइजर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 08 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
7 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइट रायडर्स | 10 ऑक्टोबर, 2020 | दुपारी 3:30 | शारजाह |
8 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 15 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
9 | मुंबई इंडियंस वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 18 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
10 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स | 20 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
11 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायजर्स हैदराबाद | 24 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | दुबई |
12 | कोलकाता नाइटरायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 26 ऑक्टोबर, 2020 | संध्याकाळी 7:30 | शारजाह |
13 | किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स | 30 ऑक्टोबर, 2020 | दुपारी 7:30 | अबू धाबी |
14 | चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब | 01 नोव्हेंबर, 2020 | दुपारी 3:30 | अबू धाबी |
किंग्स इलेव्हन पंजाब अनिल कुंबळे आणि केएल राहुल यांच्या नेतृत्त्वात आपलं नाव विजेतेपदावर कोरण्यासाठी उत्सुक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझिलंडच्या विरुद्धच्या लढतीत मॅन ऑफ द सीरिजचा किताब जिंकणाऱ्या केएल राहुलला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये राहुल संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
याव्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाबला ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लॅन मॅक्सवेलकडून खूप अपेक्षा आहेत. 2014मध्ये आयपीएलचे जे सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले त्यामध्ये मॅक्सवेल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. एवढचं नाहीतर संघात क्रिस गेल, मोहम्मद शमी यांसारख्या दिग्गज आणि रवि बिश्नोई सारख्या नव्या खेळाडूंमुळे संतुलन असल्याचं दिसत आहे. मोहम्मद शमीने किंग्स इलेव्हन पंजाबचा संघा सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सीएसकेला आणखी एक धक्का; हरभजननंतर आणखी एक स्टार खेळाडू बाहेर
- IPL 2020 | प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीचे दमदार शॉट्स; रायडू आणि वॉटसनचीही धमाकेदार खेळी
- ...म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा
- IPL 2020 | आधी चेन्नई आता दिल्ली.... दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव
- IPL 2020 MI Schedule: मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक