एक्स्प्लोर

गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे.

मुंबई: आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस (Gas) आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या वतीने आपण जनतेला असं आवाहन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे, घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी फेसबुक पोस्टवरुन दिलीय. 

जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन

गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअ‍ॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

LPG गॅसची कोणतीही अडचण नाही

सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बुकिंग करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी कार्यालयांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता, या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर भाष्य केलंय. LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.

हेही वाचा

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, 'LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय'

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
MPSC Drug Inspector Exam : औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला? आता रीतसर गुन्हा दाखल होणार, एमपीएससीकडून मोठी माहिती
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला? आता रीतसर गुन्हा दाखल होणार, एमपीएससीकडून मोठी माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
Embed widget