IPL 2020 | सीएसकेला आणखी एक धक्का; हरभजननंतर आणखी एक स्टार खेळाडू बाहेर
21 ऑगस्ट रोजी दुबईत दाखल झाल्यानंतर सीएसके संघातील 13 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. ऋतुराज गायकवाड आणि दीपक चहर या दोघांना कोरोनाची लागण झाली होती.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीने होणार आहे. अवघ्या दोन दिवसांतच आयपीएलला सुरुवात होणार आहे. परंतु, आयपीएलमधील स्टार टीम सीएसकेवरील संकटं कमी होण्याचं नाव घेत नाहीत. चेन्नई सुपर किंग्स संघातील कोरोना पॉझिटिव्ह असलेला दुसरा खेळाडू ऋतुराज गायकवाड संघाच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज गायकवाडने दोन आठवड्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. तसेच त्याच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणंही नाहीत. परंतु, त्याला अद्यापही संघासोबत खेळण्यासाठी आयपीएलच्या अटींनुसार, दोन कोरोना टेस्ट कराव्या लागणार आहेत. दोन्ही टेस्टचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतरच ऋतुराज संघासोबत खेळू शकतो.
सीएसकेच्या सीईओनी बीसीसीआयकडे ऋतुराज संदर्भात स्पष्टीकरण मागितलं आहे. ते म्हणाले की, 'आम्ही वाट पाहत आहोत की, बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड यांच्या मुद्द्यावर आम्हाला स्पष्टीकरण द्यावं. ऋतुराज गायकवाड संघात वापसी कधी करणार हे कळायला अजून दोन दिवस लागू शकतात.' सीईओ म्हणाले की, ऋतुराज गायकवाड वेगळ्या आयसोलेशन पॅसिलिटीमध्येच राहणार आहेत.
A complete #YelloveGame when the Kings Clash! #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/QxRfeqXmdP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 15, 2020
21 ऑगस्ट रोजी दुबईत दाखल झाल्यानंतर सीएसके संघातील 13 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज दीपक चहरही कोरोना पॉझिटिव्ह होता. चहरने कोरोनामुक्त होऊन संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली असून तो आपला पहिला सामना खेळण्यासाठी तयार आहे.
धोनीच्या संघाला मोठा दिलासा; 'या' स्टार खेळाडूची संघात वापसी
सीएसकेपुढे मोठं आव्हान
दुबईत दाखल झाल्यापासूनच सीएसके अनेक आव्हानांचा सामना करत आहे. अशातच संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आयपीएलमधून माघार घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. रैनाने आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये खेळणार नसल्याची घोषणा केली आहे. सीएसकेने रैनाच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी देण्याची इच्छा आहे. परंतु, 20 दिवसांनंतरही अद्याप या खेळाडूचा कोरोना व्हायरस अहवाल नेगेटिव्ह आलेला नाही. तसेच दिग्गज स्पिनर हरभजन सिंहने देखील वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या 13 व्यासीझनमधून माघार घेतली आहे. परंतु, अद्याप सीएसकेने या दोन खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची मागणी केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :