एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2020 | आयपीएलच्या महासोहळ्यासाठी यूएई सज्ज, उद्यापासून तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार

उद्यापासून आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार आहे. आयपीएलच्या या महासोहळ्यासाठी संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई सज्ज आहे. यूएईच्या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं हे युद्ध रंगणार आहे.

संयुक्त अरब अमिरात...म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात शनिवारपासून (19 सप्टेंबर) पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएलचा महासोहळा रंगणार आहे.

खरंतर दरवर्षीप्रमाणे मार्च ते मेदरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांसारखे पर्यायही समोर आले. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्याचं बीसीसीआयने पक्क केलं.

यूएईची राजधानी अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं हे युद्ध रंगणार आहे.

पाहूया कोणत्या स्टेडियम्सवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

IPL 2020 | आयपीएलच्या महासोहळ्यासाठी यूएई सज्ज, उद्यापासून तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार दुबईतल्या या नव्या स्टेडियमवर आयपीएलच्या 56 साखळी सामन्यांपैकी सर्वाधिक 24 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यासोबतच अंतिम सामनाही याच स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी

IPL 2020 | आयपीएलच्या महासोहळ्यासाठी यूएई सज्ज, उद्यापासून तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार यंदाच्या आयपीएलचा उद्घाटनाचा सामना अबुधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडणार आहे. यासह एकूण 20 साखळी सामने या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

शारजाह क्रिकेट स्टेडियम

IPL 2020 | आयपीएलच्या महासोहळ्यासाठी यूएई सज्ज, उद्यापासून तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार यूएईतलं सर्वात जुनं स्टेडियम असलेलं शारजाह क्रिकेट स्टेडियम हे यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठीचं तिसरं ठिकाण आहे. याठिकाणी 12 साखळी सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएलचं आयोजन देशाबाहेर करण्याची ही आजवरची तिसरी वेळ आहे. याआधी लोकसभा निवडणुकांमुळे 2009 साली दक्षिण आफ्रिकेत तर 2014 साली दुबईतच आयपीएलचा सोहळा रंगला होता.

आयपीएलवर कोरोनाचा प्रभाव आयपीएल म्हटलं की प्रेक्षकांनी भरलेली स्टेडियम्स, 40-50 हजार प्रेक्षकांचा तो जल्लोष, फलंदाजांच्या चौकार-षटकारानंतर स्टेडियममध्ये घुमणारा आवाज... हे सगळं दरवर्षी आपण पाहतो. पण यंदा ते वातावरण आपल्याला दिसणार नाही आणि याचं कारण अर्थातच कोरोना

कोरोनामुळे यंदाचं आयपीएल बंद दाराआड म्हणजेच रिकाम्या स्टेडियम्समध्ये खेळवलं जाणार आहे. कोरोनाच्या या वातावरणाचा परिणाम संघांच्या तयारीवरही दिसून येतोय. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यास त्याचा फटका संपूर्ण संघाला बसू शकतो. यासाठी बायो सिक्युअर बबलसारख्या सुरक्षेच्या उपाययोजना बीसीसीआयकडून राबवण्यात येत आहेत.

एकूणच यंदाचं आयपीएल खास असणार आहे. कोरोनाचं संकट, त्यामुळे स्पर्धेचं बदललेलं वेळापत्रक, खेळाडूंची सुरक्षितता या सगळ्या बाबी आय़पीएलच्या दृष्टीने तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आयपीएलचा हा तेरावा मोसम कसा पार पडतो याचीच आता उत्सुकता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबारRahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणीSudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणीABP Majha Headlines :  12 PM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Embed widget