(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020, CSK vs SRH : धोनीकडून फंलदाजीतील अपयशाची कबुली; सांगितली पराभवाची कारणं
धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नईचा आयपीएल 2020 मधील सलग तिसरा पराभव आहे. कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिला, परंतु, नाबाद 47 धावा काढल्यानंतरही संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरला.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग तीन सामन्यांत पराभव झाला. सीएसकेवर 7 धावांनी हैदराबादने मात केली. धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नईचा आयपीएल 2020 मधील सलग तिसरा पराभव आहे. कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिला, परंतु, नाबाद 47 धावा काढल्यानंतरही संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरला. सामन्यानंतर मात्र धोनीने आपल्या अपयशाची कबुली दिली.
धोनी म्हणाला की, तो चेंडूंला आपल्या बॅटच्या मधोमध घेण्यात अपयशी ठरत होता. धोनी म्हणाला की, 'मी चेंडू बॅटच्या मधोमध घेऊ शकत नव्हतो, कदाचित जोरात फटके मारण्याच्या प्रयत्नात तसं होत असाव.'
कालच्या सामन्यात धोनी शेवटपर्यंत प्रयत्न करत होता. परंतु, तरिदेखील तो संघाला यश मिळवून देण्यात अपयशी ठरला. यादरम्यान धोनीला थकवा आल्यासारखंही वाटत होतं. यासंदर्भात बोलताना धोनी म्हणाला की, 'मी ठिक आहे. अशा परिस्थितीत बऱ्याचदा गळा सुकतो.'
चेन्नईने यंदाच्या सीझनची सुरुवात मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात विजयाने केली होती. परंतु, त्यानंतर सलत तीन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भात बोलताना चेन्नईचा कर्णधार धोनी म्हणाला की, 'खूप वर्षांपूर्वी आमचा सलग तीन सामन्यांमध्ये पराभव झाला होता. आम्हाला कॅच पकडून प्रतिस्पर्ध्यांना बाद करावं लागेल, गोलंदाजी करताना नो बॉल अजिबात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. अनेकदा आपण सैल पडतो. आमचे सुरुवातीचे दोन ओव्हर्स चांगले गेले. पण संपूर्ण सामन्यांत आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असतो. कोणालाही कॅच सोडण्याची इच्छा नसते. परंतु, या स्तरावर तुम्हाला हे पाहावं लागेल की, ते कॅच घेणं किती महत्त्वाचं ठरतं ते.'
दरम्यान. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनमध्ये सीएसकेचा संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. जर धोनीच्या संघाने पुढिल दोन किंवा तीन सामन्यांमध्ये वापसी केली नाही तर मात्र चेन्नईचा प्रवास यंदाच्या आयपीएलमध्ये अत्यंत कठिण असेल.
महत्त्वाच्या बातम्या :