(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा करणार
IND vs AUS: येत्या आक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी-20 विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे.
IND vs AUS: येत्या आक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी-20 विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा करण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रिलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाण्याची शक्यता आहे.
फॉक्स स्पोर्ट्सच्या अहवालात म्हटलं आहे की, 'ऑस्ट्रेलिया सप्टेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर तीन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर झिम्बाब्वे, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघ त्यांच्या आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार
आयपीएलनंतर आणि टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ चौथी टी-20 मालिका खेळेल. आयपीएलचा पंधरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेला येत्या 9 जून पासून सुरुवात होणार आहे. तर अखेरचा सामना 19 जून रोजी खेळले जाणार आहेत. या मालिकेतील सामने दिल्लीसह कटक, विशाखापट्टनम, राजकोट आणि बंगळुरूत आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. डबलिन येथे 25 जूनला पहिला तर, 28 जूनला दुसरा सामना खेळणार जाणार.
इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 2021 मध्ये खेळण्यात आलेल्या पाच सामन्यातील राहिलेला एक सामना खेळणार आहे. कोरोना महामारीमुळं भारत- इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. या एकमेव कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
हे देखील वाचा-