![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Watch: सलमान खानला ओळखतोस का?, पाहा रबाडा काय म्हणाला...
IPL 2022 Marathi News : पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा व्हिडीओ सध्या व्हायरला झालाय. या व्हिडीओत रबाडा हिंदी चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसतोय.
![Watch: सलमान खानला ओळखतोस का?, पाहा रबाडा काय म्हणाला... when asked about salman khan rabada gave such an answer that the anchor was surprised video viral on social media Watch: सलमान खानला ओळखतोस का?, पाहा रबाडा काय म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/7278ee623f4d31c8a67f1862cfe001a9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kagiso Rabada Viral Video : पंजाब किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा व्हिडीओ सध्या व्हायरला झालाय. या व्हिडीओत कगिसो रबाडा हिंदी चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसतोय. पंजाब किंग्सने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत अँकरने रबाडाला तू सलमान खानला ओळखतोस का? असा प्रश्न विचारला. यावर रबाडाने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय आहे. अँकरच्या प्रश्नावर कगिसो रबाडाने नाही असे उत्तर दिले.. तो म्हणाला मी फक्त राशिद खानला ओळखतो.. रबाडाच्या उत्तरानंतर अँकर आश्चर्यचकीत झाली होती.
पंजाब किंग्स संघाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत कगिसो रबाडा सलमान खानच्या वाँटेड चित्रपटातील डायलॉग 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता' बोलताना दिसत आहे. याच व्हिडीओत ओडियन स्मिथही सनी देओलचा दामिनी चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. नॅथन एलिसही या व्हिडीओत बॉलिवूड अभिनेता किंग खानचा डायलॉग म्हणताना दिसला.
पाहा व्हिडीओ..........
आयपीएलच्या 15 व्या हंगामात पंजाबची कामगिरी चढ उतरांनी भरलेली दिसली. मयांक अग्रवालच्या नेतृत्वातील पंजाब संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पंजाब संघाला आतापर्यंत 11 सामन्यात फक्त सहा विजय मिळवता आलेत. पंजाबला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. पंजाबचा पुढील सामना फाफच्या नेतृत्वातील आरसीबीबरोबर होणार आहे. त्यानंतर पुढील दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध आहेत.
हे देखील वाचा-
- Top 10 Key Points : बुमराहाचा पंच वाया, कोलकाता जिंकले, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- SuryaKumar Yadav : 'मी माझा कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी...' आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादव भावूक
- IPL 2022: यशस्वीच्या तुफान फलंदाजीवर संजू सॅमसन खूश, देणार मोठं गिफ्ट; राजस्थाननं पोस्ट केला व्हिडिओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)