एक्स्प्लोर

Shreyas Iyer : प्रशिक्षक आणि कर्णधारच नाही तर संघाचे CEO देखील टीम सिलेक्शनमध्ये घेतात भाग, श्रेयसच्या विधानाने खळबळ

मुंबई इंडियन्स विरुद्धत्या विजयानंतर बोलताना श्रेयस अय्यरने एक मोठं विधान दिलं आहे. सामन्यापूर्वी संघनिवड करताना संघाचे सीईओ देखील यात सहभाग घेत असल्याचं मोठं विधान श्रेयस अय्यरने केलं आहे.

Shreyas Iyer On KKR : आयपीएल (IPL 2022) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सला (MI) 52 धावांनी मात दिली. या सामन्यातील विजयात केकेआरचा स्टार खेळाडू पॅट कमिन्सने एकप्रकारे पुनरागमन केलं. केकेआर या सामन्यासाठी 1-2 नाही तर तब्बल 5 बदलांसह मैदानात उतरला होता. दरम्यान या विजयानंतर बोलताना श्रेयस अय्यरने एक मोठं विधान दिलं आहे. सामन्यापूर्वी संघनिवड करताना संघाचे सीईओ देखील यात सहभाग घेत असल्याचं मोठं विधान श्रेयस अय्यरने केलं आहे.

दरम्यान श्रेयसच्या या विधानानंतर मोठी खळबळ उडाली आहे. क्रिकेटची अधिक जाण असणाऱ्या प्रशिक्षक तसंच संघचा कर्णधार यांच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीलाही संघ निवडीचे अधिक असल्याने अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरच्या मते काही मोठे निर्णय यंदा संघाने घेतले आहेत. पॅट कमिन्ससारख्या खेळाडूला अंतिम 11 मध्ये न घेणं हा एक अत्यंत मोठा निर्णय होता. संघाचे अंतिम 11 निवडताना टीमचे सीईओ देखील मदत करत असतात असं श्रेयस म्हणाला. दरम्यान केकेआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचे सीईओ अशी कोणतीही भूमिका बजावत नाहीत. त्यांचं मत विचारल्यास ते सल्ला देतात पण अंतिम निर्णय़ कर्णधार आणि कोच यांचाच असल्याचं या सूत्रांनी सांगितलं आहे.

मुंबईचा मोठा पराभव

जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन यांच्या दमदार खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावे लागले. कोलकात्याने मुंबईचा तब्बल 52 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 113 धावांत गारद झाला. मुंबईच्या संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत.यावेळी केकेआरच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार खेळीमुळेच हा विजय संघाने मिळवला. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget