SRH vs CSK, Pitch Report : हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पहिला लखनौ सुपरजांयट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यानंतर दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये रंगणार आहे.
SRH vs CSK, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्स (SRH vs CSK) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघामध्ये आजची लढत चुरशीची होऊ शकते. कारण आजवरच्या इतिहासात चेन्नई हैदराबादवर भारी असले तरी यंदा हैदराबादचा फॉर्म कमाल आहे. ज्यामुळे आजचा सामना अटीतटीचा होईल.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीने 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते चौथ्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे चेन्नई 8 पैकी केवळ 2 सामने जिंकत 4 गुणांसह नवव्या स्थानी आहे. त्यात आजवरच्या इतिहासाचा विचार आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ 17 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये चेन्नईच्या संघाने 12 वेळा बाजी मारली आहे. तर सनराइजर्स हैदराबाद (SRH) संघाला पाच वेळा विजय मिळालाय.
हैदराबाद विरुद्ध चेन्नई अशी असेल ड्रीम 11 (PBKS vs CSK Best Dream 11)
विकेटकीपर- रिद्धिमान साहा
फलंदाज- रॉबिन उथप्पा, केन विलियमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी
ऑलराउंडर- शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, शशांक सिंह
गोलंदाज- ड्वेन ब्रॉवो, मार्को जानसेन, उम्रान मलिक
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. त्यात सामना हा सायंकाळच्या सुमारास असल्याने दव पडण्याची दाट शक्यता असणार आहे. ज्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्यांना अधिक अडचण होऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे.