(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS vs CSK : चेन्नई-पंजाबमध्ये लढत, कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : मुंबईच्या वानखेडे मैदानात आज चेन्नई आणि लखनौ संघ आमने-सामने असणार आहे.
IPL 2022, PBKS vs CSK : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) चेन्नई आणि पंजाबचा संघ मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघाची यंदाच्या आयपीएलमधी निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवशक आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये 26 सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने 15 सामन्यात विजय मिळवला य. तर 11 सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघाची कामगिरी खराब झाली आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ आठव्या तर चेन्नईचा संघ नवव्य क्रमांकावर आहे. दोन्ही संघात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणार आहे. गोलंदाजीही धारधार आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंकाच नाही. कोणताही खेळाडू दमदार कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आज होणाऱ्या पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 24 एप्रिल रोजी होणारा पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
नाणेफेक महत्वाची –
चेन्नई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नाणेफेक महत्वाची भूमिका बजावणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघ फायद्यात राहू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेऊ शकतो.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. महत्वाचं म्हणजे, वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.