RCB vs KKR, Head to Head : कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ सामना खेळणार आहेत.
RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडू मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे नवे कर्णधार असल्याने नव्या रणनीतीने दोन्ही संघ खेळताना दिसतील. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवू...
कोलकाता विरुद्ध बंगळुरु Head to Head
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर दमदार प्रदर्शन केलं आहे. दोघे आजवर तब्बल 29 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये केकेआरचे पारडे काहीसे जड दिसून आले आहे. आजवर झालेल्या 29 सामन्यांपैकी केकेआरने 16 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 13 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यात यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने एक विजय मिळवला असून आरसीबीला एक पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही केकेआर सरस ठरणार की आरसीबी दम दाखवणार पाहावे लागेल.
आयपीएलच्या मागील हंगामातील प्रदर्शन
मागील सीजनमध्ये आरसीबी आणि केकेआर या दोन्ही संघानी दमदार प्रदर्शन केलं. दोन्ही संघ चषकाच्या जवळ जाऊन पराभूत झाले. केकेआर फायनलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभूत झाला होता. तर केकेआर आणि आरसीबी यांनी मागील आयपीएलमध्ये एकूण तीन सामने एकमेंकाविरुद्ध खेळले. यात केकेआरने दोन तर आरसीबीने एक सामना जिंकला होता.
हे देखील वाचा-
- RCB vs KKR : कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्यात कशी असेल रणनीती, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध
- IPL 2022, RCB vs KKR : श्रेयसचे रायडर्स लढणार फाफच्या चँलेजर्सशी, कधी, कुठे पाहाल सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha