KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
IPL 2022 : आज होणाऱ्या पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात नेमके कोणते खेळाडू उतरतील याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
CSK vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा आठवा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या सामन्यात पंजाबचा संघ मैदानात उतरेल. पंजाबने पहिल्या सामन्यात 206 धावांचे आरसीबीचे लक्ष पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून दुसरीकडे कोलकात्याने पहिल्या सामन्यात तर चेन्नईला त्यांनी मात दिली. पण दुसऱ्या सामन्यात आरसीबीने त्यांना मात दिली आहे. त्यामुळे आज ते कशी रणनीती आखणार पाहावे लागेल.
आज पार पडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील (KKR vs PBKS) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी याआधीच्या सामन्यात खेळलेल्या खेळीचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for KKR vs PBKS) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया...
कोलकाता संभाव्य अंतिम 11
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी
पंजाब संभाव्य अंतिम 11
मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर
हे देखील वाचा-
- IPL 2022, KKR vs PBKS : कोलकात्यासमोर आज पंजाबचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- Dywane Bravo IPL Record: चॅम्पियन डिजे BRAVO! मलिंगाचा विक्रम मोडला, ब्राव्होच्या नावावर नवा रेकॉर्ड
- IPL 2022, LSG vs CSK: लखनौचा सुपर विजय, चेन्नईचा सहा गड्यानी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha