एक्स्प्लोर

मैच

IPL 2022, LSG vs CSK: लखनौचा सुपर विजय, चेन्नईचा सहा गड्यांनी पराभव

IPL 2022, LSG vs CSK: कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले.

IPL 2022, LSG vs CSK: कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली.  डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 धावांची छोटेखानी खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा हा पहिला विजय आहे. लखनौला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. 

राहुल-डिकॉकची सलामी - 
चेन्नईने दिलेल्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने दणक्यात सुरुवात केली. कर्णधार के.एल राहुल आणि डिकॉक यांनी 99 धावांची भागिदारी केली. राहुल आणि डिकॉक यांनी विजयाचा पाया रचला. त्यावर लुईसने कळस चढवला. राहुलने 26 चेंडूत 40 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. डिकॉकने 45 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. 

लुईसचा फिनिशिंग टच - 
लुईसच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनौने चेन्नईचा सहा गड्यांनी पराभव केला. लुईसने मोक्याच्या क्षणी 23 चेंडूत 53 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकार लगावले. लुईसशिवाय दीपक हुड्डाने 8 चेंडूत 13 तर आयुष बडोनीने 9 चेंडूत 19 धावांची खेळी केली.

चेन्नईची फ्लॉप गोलंदाजी, अन् खराब श्रेत्ररक्षण - 
चेन्नईच्या एकाही गोलंदाजाला आपल्या लकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. प्रेटोरिइसने दोन विकेट घेतल्या. तर ब्राव्हो आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 210 धावांचा डोंगर उभा केला.  लखनौकडून रवी बिश्नोई याने दर्जेदार गोलंदाजी केली. लखनौचा कर्णधार के.एल. राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजांनी पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेत धावांचा पाऊस पाडला. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे याच्या आक्रमक खेळीला मोईन अली, रॉबिन उथप्पा यांनी चांगली साथ दिली. तर धोनीच्या फिनिश टचमुळे चेन्नईने 210 धावांपर्यंत मजल मारली.  लखनौकडून रवी बिश्नोई, आवेश खान आणि अँड्रू टाय यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 

रॉबिन उथप्पाची विस्फोटक खेळी - 
सलामीविर रॉबिन उथप्पा याने वादळी खेळी करत लखनौच्या गोलंदाजाची पिसे काढली. उथप्पाने सुरुवातीपासूनच लखनौच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. रॉबिन उथप्पाने अवघ्या 25 चेंडूत अर्शतक झळकावले. रवी बिश्नोईने उथप्पाचा अडथळा दूर केला. उथप्पाने एक षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. 

मोईन अली - अंबाती रायडूची छोटेखानी खेळी - 
अष्टपैलू मोईन अली आणि अंबाती रायडू यांनी छोटेखानी खेळी करत चेन्नईची धावसंख्या वाढवली. मोहईन अलीने  22 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूने 20 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार लगावत 27 धावा जोडल्या. 

शिवम दुबेचं अर्धशतक हुकलं -
एका बाजूला विकेट पडत असताना शिवम दुबे याने दुसरी बाजू लावून धरली. दुबेने विकेट तर पडू दिली नाहीच, शिवाय धावांचा पाऊसही पाडला. पण शिवम दुबेचं अर्धशतक फक्त एका धावेनं हुकलं. दुबे 30 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान दुबेनं दोन षटकार आणि पाच चौकार लगावले.

धोनीचा पहिल्याच चेंडूवर षटकार - 
कर्णधारपद सोडल्यानंतर एम.एस धोनीचं आक्रमक रुप पुन्हा एकदा समोर आले आहे. लखनौविरोधात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. धोनीने सहा चेंडूत 16 धावांची खेळी केली. 

बिश्नोईचा भेदक मारा -
फिरकीपटू रवी बिश्नोई याने चेन्नईविरोधात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चेन्नईच्या फलंदाजांना बिश्नोईने कोणतीही संधी दिली नाही. बिश्नोईने चार षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले. बिश्नोई लखनौचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बिश्नोईने सर्वात कमी धावा खर्च केल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ?Uddhav Thackeray :शिवसेना ठाकरे गटाचं मशाल गीत प्रदर्शित ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 16 April 2024Vaishali Darekar Kalyan Loksabha : वैशाली दरेकरांच्या प्रचार रॅलीत गणपत गायकवाडांच्या पत्नी सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Kalyan Loksabha: कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
Embed widget