GT vs CSK, Pitch Report : चेन्नई-गुजरात आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आज पुण्याच्या एमसीए मैदानात पार पडणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती आणि कोणते खेळाडू चांगली खेळी करु शकतात यावर नजर फिरवूया...
GT vs CSK, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. दोन्ही संघाच्य कामगिरीचा विचार करता चेन्नईने केवळ एक विजय मिळवला आहे. तर गुजरात केवळ एकदा पराभूत झाली आहे. दोन्ही संघाचा आज सहावा सामना असणार आहे. आजच्या सामन्यातही काही विशिष्ट खेळाडूंकडे सर्वाचे लक्ष असेल. नेमके अंतिम 11 खेळाडू (Final 11) नाणेफेक झाल्यावर स्पष्ट होतील पण तरी दोन्ही संघात मिळून कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पार पडणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानावर (MCA Ground, Pune) आतापर्यंत पाच पैकी तीन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना दवाची अडचण अधिक येत नसल्याने गोलंदाजी चोख पडते. यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेऊ शकतो. चेन्नईने या ठिकाणी चांगली कामगिरी केली असून आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे.
चेन्नई विरुद्ध गुजरात अशी असेल ड्रीम 11 (CSK vs GT Best Dream 11)
विकेटकीपर- मॅथ्यू वेड
फलंदाज- रॉबिन उथप्पा, डेव्हिड मिलर, शुभमन गिल
ऑलराउंडर- हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, रवींद्र जाडेजा
गोलंदाज- मोहम्मद शमी, महेश तिक्षणा, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन
हे देखील वाचा-
- MI vs LSG, Top 10 Key Points : मुंबईचा पराभवांचा 'षटकार', लखनौचा 18 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा
- IPL 2022, GT vs CSK : आज गुजरात विरुद्ध चेन्नई मैदानात; कधी, कुठे पाहाल सामना?