चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस
World Cup 2024 : दोन जूनपासून टी 20 विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. यामध्ये टीम इंडिया (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळताना दिसणार आहे.
Reserve Day For India v Pakistan in T20 World Cup 2024 : दोन जूनपासून टी 20 विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. यामध्ये टीम इंडिया (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी (Team India vs Ireland) होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना न्यूयॉर्कमध्ये (New York) 5 जूनला खेळवला जाणार आहे. यानंतर मात्र चाहते ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत, तो हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. 9 जून रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या अटीतटीच्या सामन्यापूर्वी क्रीडा चाहत्यांसाठी आनंदची बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जून रोजी सामना खेळवला जाईल. भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत एक राखीव दिवस असेल. म्हणजेच या दिवशी पावसाने व्यत्यय आणला तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल.
आयसीसीच्या आज झालेल्या वार्षिक बैठकीत विश्वचषकातील राखीव दिवसाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. टी 20 विश्वचषकात ग्रुप स्टेज आणि सुपर-8 सामन्यांचा निकाल जाहीर होण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 5 षटकांचा सामना खेळावा लागेल. तर बाद फेरीतील निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान 10 षटकं खेळावी लागतील. त्या आधारेच विजेत्याची निवड केली जाणार आहे.
भारतीय संघाचे सामने -
यंदाच्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत करण्यात आले आहे. विश्वचषकात भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या पहिला सामना खेळणार आहे. त्या सामन्यानंतर पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 27 जून रोजी होणार आहेत. यानंतर 29 जून रोजी विजेतेपदाचा सामना होईल.
JUST IN: ICC to introduce stop-clock rule permanently in white-ball cricket.
— ICC (@ICC) March 15, 2024
Details 👇
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात अनेक दिवसांपासून द्विपक्षीय सीरिज खेळली जात नाही. पण हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत एकत्र खेळताना दिसतात. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला होता. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.