एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

RCB साठी आनंदाची बातमी, करो या मरो सामन्यात डेथ ओव्हर स्पेशालिस्ट परतला 

RCB, IPL 2022 Update : क्वालिफायर 1 च्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.. आज लखनौ आणि आरसीबी यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे.

RCB, IPL 2022 Update : आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर 1 च्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.. आज लखनौ आणि आरसीबी यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. हरणारा संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे, तर जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानविरोधात भिडणार आहे. एलिमिनेटरसामन्यापूर्वी आरसीबीसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आरसीबीचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजाचे पुनरागमन झालेय. 

होय... आरसीबीचा हुकमी एक्का हर्षल पटेल तंदुरुस्त असून एलिमिनेटरमध्ये खेळण्यास सज्ज आहे. आरसीबीच्या अखेरच्या साखळी सामन्यात हर्षल पटेल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे हर्षल पटेलला अर्ध्यातून मैदान सोडावे लागले होते... त्याला चार षटकेही गोलंदाजी करता आली नव्हती. पण आता हर्षल पटेल तंदुरुस्त झाला असून संघात परतण्यास सज्ज झाला... हर्षल पटेल परतल्यामुळे आरसीबीची ताकद नक्कीच वाढणार आहे. 

गतवर्षी हर्षल पटेलने पर्पल कॅपवर कब्जा मिळवला होता. 2021 मध्ये हर्षल पटेलने 12 सामन्यात 32 विकेट घेतल्या होत्या. यंदाही हर्षल पटेल याने भेदक मारा केलाय. 13 सामन्यात हर्षल पटेलने 18 विकेट घेतल्या आहेत. डेथ ओव्हरमध्ये हर्षल पटेल भेदक मारा करतो.. सचिन तेंडुलकरनेही हर्षलची स्तुती केलीआहे. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे.

लखनौची दमदार कामगिरी
लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम खेळत आहे. या हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने 14 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय  क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच  जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे. 

आरसीबीचा आयपीएल 2022 मधील प्रवास
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते  2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget