(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 : शुभमन गिलने नाणेफेक जिंकली, चेन्नईच्या ताफ्यात भेदक गोलंदाजाचं कमबॅक, पाहा प्लेईंग 11
CSK vs GT IPL 2024 : गुजरातचा कर्णधार शुभमन गिल (Shubhaman Gill) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
CSK vs GT IPL 2024 : गुजरातचा कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj gaikwad) चेन्नई संघ (CSK) प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या पर्वात पहिल्यांदाच प्रथम आमने सामने आले आहेत. ऋतुराज गायकवाड यानेही प्रथम गोलंदाजी करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितलं. गुजरातच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्याशिवाय चेन्नईच्या ताफ्यात एक बदल करण्यात आला आहे. महिश तिक्ष्णा याला आराम देण्यात आलाय, त्याच्याजागी मथिशा पथिराणा याला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे.
गेल्या आयपीएलची फायनल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये झाली होती. त्यावेळी एमएस धोनीकडे चेन्नईची धुरा होती, तर हार्दिक पांड्या गुजरातचे नेतृत्व करत होता. पण यंदाच्या आयपीएलमधील परिस्थिती वेगळी आहे. चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघाचे कर्णधार नवखे आहेत. शुभमन गिल गुजरातचे नेतृत्व करतोय, तर चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे.
🚨 Toss Update 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
Gujarat Titans win the toss and elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/9KKISx5poZ#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/qk8xLYhUlH
चेन्नईची प्लेईंग 1
रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य राहणे, डेरिल मिचेल, शिवब दुबे, रवींद्र जाडेजा, समीर रिझवी, एम.एस धोनी(विकेटकीपर), दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमन, तुषार देशपांडे
Ruturaj Gaikwad (capt), 2 Rachin Ravindra, 3 Ajinkya Rahane, 4 Daryl Mitchell, 5 Shivam Dube, 6 Ravindra Jadeja, 7 Sameer Rizvi, 8 MS Dhoni (wk), 9 Deepak Chahar, 10 Tushar Deshpande, 11 Mustafizur Rahman
राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, मथिशा पथिराणा, निशांत सिंधू, शेख रशीद, मानव सुतार
गुजरातची प्लेईंग 11
वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), विजय शंकर, अजमतुल्हा उमरजई, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेंसर जॉन्सन
1 Wriddhiman Saha (wk), 2 Shubman Gill (capt), 3 Azmatullah Omarzai, 4 David Miller, 5 Vijay Shankar, 6 Rahul Tewatia, 7 Rashid Khan, 8 R Sai Kishore, 9 Umesh Yadav, 10 Mohit Sharma, 11 Spencer Johnson
राखीव खेळाडू -
साई सुदर्शन, बीआर शरथ, अभिनव मनोहर, नूर अहमद
चेन्नई आणि गुजरात हेड टू हेड आकडे काय सांगतात ?
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि गुजरात या दोन संघामध्ये पाच सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर गुजरातने तीन सामन्यात बाजी मारली होती. हेड टू हेड आकडेवारीमध्ये गुजरातचा संघ आघाडीवर दिसतोय.