Gujarat Titans Felicitated: गुजरातचे मुख्यमंत्री आयपीएल विजेत्या संघाला भेटले, कर्णधाराला दिली खास भेटवस्तू
Gujarat Titans Felicitated: आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय... गुजरातने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली.
Gujarat Titans Felicitated: आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय... गुजरातने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात गुजरातपुढे राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान होते. या सामन्यात राजस्थानने फलंदाजी करत 20 षटकांत 130 धावा केल्या. त्या धावांचा पाठलाग करत गुजरातने 18.1 षटकात 7 विकेट्स राखून सामना जिंकला. तब्बल दोन महिने आयपीएलचा रनसंग्राम चालला.. यामध्ये 70 पेक्षा जास्त सामने खेळले गेले. तब्बल दोन महिन्यानंतर आयपीएलचा पंधरावा हंगाम संपलाय. आयपीएलवर नाव कोरणाऱ्या गुजरात टायटन्स संघाची भेट गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हार्दिक पांड्याला स्मृति चिन्ह भेट दिलेय.
एएनआयने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलसह गुजरातच्या संघाचे काही फोटो पोस्ट केलेत. या भेटीचे खास क्षण पोस्ट करण्यात आले..भुपेंद्र पटेल यांनी गुजरात संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या... त्याशिवाय हार्दिक पांड्याला स्मृति चिन्ह भेट दिलेय.
Gujarat CM Bhupendra Patel greeted & felicitated the team of Gujarat Titans, the winners of IPL 2022. He also presented a memento to captain Hardik Pandya. pic.twitter.com/SPIHbP4iWY
— ANI (@ANI) May 30, 2022
गुजरात टायटन्सचा सात विकेट्सनं विजय
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सॅमसनचा हा निर्णय चुकीचा ठरला. राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या. गुजरात टायटन्सनं हे लक्ष्य 18.1 षटकांत सात विकेट्स राखून पूर्ण केलं.
हार्दिक पांड्याला सामनावीराचा पुरस्कार
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्यानं 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्यानं फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या. ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
हे देखील वाचा-